न .प .उपाध्यक्ष लोमेश बुरांडे यांचा सत्कार

चामोर्शी तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर 

चामोर्शी,दि. १४/१२/२०२२

संताजी स्नेही मंडळ चामोर्शीच्या वतीने तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संत संताजी जगनाडे महाराज जयंती सोहळा नगरपंचायत कार्यालय चामोर्शीच्या बाजार चौकात समाज बांधवांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक व संत साहित्याचे अभ्यासक संजय येरणे हे होते .तर प्रमुख मार्गदर्शक कमला नेहरू महाविद्यालय नागपूर येथील निवृत्त प्रा.रमेश पिसे हे होते. या जयंती उत्सव कार्यक्रमात न.प.उपाध्यक्ष लोमेश बुरांडे यांना शाल , श्रीफळ , पुष्पगुच्छा , सन्मान चिन्ह देऊन सत्कार समाज बांधवांच्या उपस्थितीत करण्यात आले.

जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय येरणे,प्रमुख मार्गदर्शक प्रा.रमेश पिसे , मार्कंडा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजाननराव भांडेकर, नगरसेवक राहुल नैताम , निशांत नैताम, आशिष पिपरे, नगरसेविका सोनाली पिपरे, काजल नैताम, स्नेहाताई सातपुते, यांचाही सत्कार मान्यंवराच्या हस्ते करण्यात आले.यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन बारसागडे यांनी तर प्रास्ताविक नगरसेवक राहुल नैताम यांनी केले.