जा. कृ.बोमनवार विद्यालयाचा विद्यार्थी मैदानी क्रीडा स्पर्धेत राज्य स्तरावर

 गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी 

चामोर्शी ,दि. १७/१२/२०२२

क्रीडा व युवक सेवा ,नागपूर विभाग,नागपूर द्वारा विभागीय स्तर मैदानी क्रीडा स्पर्धा दि.15 डिसेंबर ला जिल्हा संकुल स्टेडियम ,चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आल्या होत्या.
या स्पर्धेत जा. कृ.बोमनवार माध्य.विद्यालय तथा क.महाविद्यालय चामोर्शी येथील 19 वर्षे वयोगटातील नागेश्वर रस्से हा विद्यार्थी 3000 मी.धावणे या स्पर्धेत प्रथम क्रमांकाने विजयी झालेला असून त्याची राज्य स्तरावर निवड झालेली आहे.
त्याच्या या यशामुळे विद्यालयाच्या प्रतिष्ठेत मानाचा तुरा रोवला गेला आहे.
विद्यालयाच्या वतीने नागेश्वर रस्से या विद्यार्थ्यांचे प्र.प्राचार्य इतेंद्र चांदेकर व शिक्षक वृंदानी त्याचा सत्कार केलेला असून त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिलेल्या आहे .
नागेश्वर रस्से व मार्गदर्शक शिक्षक मनोज बोमनवार ,प्रमोद भांडारकर यांचे संस्थाध्यक्षा – सौ.छायाताई बोमनवार,उपाध्यक्ष – प्र.सो. गुंडावार गुरुजी, सचिव – रविशंकर बोमनवार, प्र.प्राचार्य – इतेंद्र चांदेकर , प्राध्यापक,प्राध्यापिका ,शिक्षक ,शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.