नंदकिशोर नल्लुरवार प्रतिनिधी न्यूज जागर, चामोर्शी
जिल्ह्यातील एकमेव केंद्र सरकार द्वारा 36 वर्षांपासून चालविल्या जाणाऱ्या CBSE निवासी शाळा असलेल्या जवाहर नवोदय विद्यालय घोट ला आता येणार सोनेरी दिवस.नुकतीच मा खासदार अशोकजी नेते यांचे नेतृत्वात नवोदय विद्यालय घोट येथील पालकांच्या शिष्टमंडळाने दिल्ली येथे नवोदय विद्यालय समितीचे कमिशनर मा विनायक गर्ग केंद्रीय शिक्षण मंत्री मा धर्मेंद्रजी प्रधान यांची भेट घेऊन महत्वाच्या पायाभूत समस्येवर सविस्तर सकारात्मक चर्चा केली. मागील 36 वर्षांपासून घोट येथील समस्यांना केवळ वन जमिनीचा मुद्दा पुढे करून विकास थांबून गेला होता.मात्र नुकतीच वनजमिनीची अडचण दूर झाल्याने पुढील टप्पा 2 व टप्पा 3 च्या बांधकामासाठी महोदयांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.सोबतच महाराष्ट्र शासनाने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याला hard station ( नक्षलग्रस्त) जिल्हा घोषित करून देखील केवळ घोट येथील नवोदय विद्यालायला मात्र त्यापासून वंचित ठेवण्यात आले होते.यापुढे नवोदयचे विद्यार्थी व स्टाफ साठी देखील hard station योजना लागू करण्याचे वचन कमिशनर यांनी शिष्टमंडळाला दिले. विशेष बाब म्हणून एकंदरीत 50 % टक्के चें वर जिल्ह्यातील sc व st लोकसंख्या असल्यास जिह्यात दुसरी नवोदय सुरू केली जाते. या वर देखील मान्यवरांनी सकारात्मकता दर्शवून जिल्ह्यात दुसरी नवोदय सुरू करण्याचे आश्वासन दिले. या व इतर मागण्यासाठी महोदयांची दिल्ली येथे जाऊन शिष्टमंडळाने भेट घेऊन प्रश्न निकाली काढण्यासाठी सकारात्मक प्रयन्त केले. पालकांचे शिष्टमंडळात ओमप्रकाश साखरे, सोहन माहोरकर, राकेश शर्मा व मोरेश्वर भैसारे हजर होते.👍🏻👍🏻