श्री.विलास ढोरे,वडसा तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
देसाईगंज/दि.२३/०१/२०२३
महात्मा गांधी विद्यालय देसाईगंज येथे वार्षिक स्नेहसंमेलन
महात्मा गांधी विद्यालय तथा विज्ञान व एच. एस.सी. व्होकेशनल अभ्यासक्रमाचे कनिष्ठ महाविद्यालय देसाईगंज येथील वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा हटवार सभागृह, देसाईगंज येथे आज दिनांक 23 जानेवारी 2023 पासून 24 व 25 जानेवारी 23 रोजी पर्यंत चालणाऱ्या स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे उद्घाटन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी उद्घाटन स्थानावरून गजबे म्हणाले की, स्नेहसंमेलन सोहळा हा विद्यार्थ्यांसाठी आपले सुप्त कला प्रकट करण्याचे एक उत्तम व्यासपीठ असून कलागुण प्रकट करण्याच्या संधीचे सोने करावे व जीवनात संपन्न आयुष्य जगावे असे प्रतिपादन आमदार कृष्णा गजबे यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष श्री लालसिंग खालचा प्राचार्य महात्मा गांधी कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आरमोरी, श्री जयंतरावजी हटवार अध्यक्ष ज्ञा.वि.शि.प्र. मंडळ देसाईगंज, सौ अंजलिताई जे. हटवार सहसचिव ज्ञा.वि.शि.प्र. मंडळ, श्री एच बी राहाटे सदस्य ज्ञा.वि.शि.प्र. मंडळ, श्री एल. बी. पिलारे सदस्य, ज्ञा. वि. शि. प्र. मंडळ देसाईगंज
सौ. सोनालीताई पी. नाचनकर, सदस्या. ज्ञा.वि.शि.प्र.मंडळ देसाईगंज, श्री किशोर खंडाईत सदस्य ज्ञा. वि. शि. प्र. मंडळ देसाईगंज, मा. महेशजी एस. मुंडले सदस्य ज्ञा. वि. शि. प्र. मंडळ देसाईगंज आदी उपस्थित होते.