श्री.विलास ढोरे,वडसा तालुका प्रतिनिधी ,न्यूज जागर
देसाईगंज,दि.२३/०१/२०२३
तत्काळ स्वच्छता मोहीम राबवा,अन्यथा कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
युवक काँग्रेस शहर अध्यक्ष पिंकु बावणे यांचा मुख्याधिकाऱ्यांना इशारा
शहराच्या गांधी वार्डातील मानवता प्राथमिक शाळेच्या लगतची नाली सांडपाणी व घनकचरा साचल्याने तुंबली असुन शालेय परिसरात दुर्गंधी पसरली आहे.या बाबत शालेय शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नगर परिषदेकडे वारंवार सुचना पञ देऊनही नाली स्वच्छ करण्याकडे कानाडोळा करण्यात येत असल्याने येथील शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.त्या अनुषंगाने तुंबलेल्या नालीची तत्काळ सफाई करून समस्या मार्गी लावण्यात यावी अन्यथा विरोधात नगर परिषद कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देसाईगंज शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष पिंकु बावणे यांनी मुख्याधिकारी डाॅ. कुलभुषण रामटेके यांना दिलेल्या प्रसिद्धी पञकातुन दिला आहे.
शहराच्या गांधी वार्डातील मानवता प्राथमिक शाळेच्या आवारातुन जात असलेल्या मुख्य नालीत सांडपाणी व घनकचरा साचून राहण्याची समस्या नितनियमित झाली आहे.याबाबत शाळेच्या वतीने संबंधित कर्मचारी, अधिकाऱ्यांना तब्बल पाच वर्षापासून येथील समस्या अवगत करुन देण्यात येत आहेत.
घनकचरा साचुन राहात असल्याने साप,विंचू निघतात.दुर्गंधी सुटली असल्याने परिसरात वावरणे देखील असह्य होत आहे. समस्या गंभीर असताना नगर परिषद स्वच्छतेसाठी लाखो रुपये खर्च करीत असल्याचे दाखवित असताना शाळेच्या आवारातीलच समस्या मार्गी लावण्यात येऊ नये,यावरुन नगर प्रशासनाचा भोंगळ व मनमानी कारभार जबाबदार असल्याचे दिसून येत आहे. येथील गंभीर समस्या लक्षात घेता सांडपाण्याचा तत्काळ निचरा होऊन घनकचरा साचून राहणार नाही,याची दक्षता घेण्यात यावी अन्यथा विरोधात नगर परिषद समोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा बावणे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पञकातुन दिला आहे.
यावेळी देसाईगंज तालुका महासचिव पंकज चहांदे, युवक काँग्रेसचे सागर वाढई, मानवता प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एम.पि. खंडाईत,शिक्षिका दहिवले, चमलाटे,तिघरे,गंडे, बावणे, नाकाडे,गायकवाड,उईके आणि लिपिक ए.जी.पूरकाम आदी शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.