श्री.नंदकिशोर वैरागडे,विशेष प्रतिनिधी गडचिरोली जिल्हा, न्यूज जागर
कोरची,दि.२३/०१/२०२३
आमदार कृष्णा गजबे यांनी क वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा देऊन विकास करण्याची दिली ग्वाही
17 जानेवारी पासून सुरू असलेल्या सुश्री किशोरी राधीकाश्रीजी वृंदावन यांच्या शिव महान पुराण सप्ताहाच्या सहाव्या दिवशी आरमोरी निर्वाचन क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी भेट देऊन झापरागड देवस्थानाचे क वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा प्राप्त करून यांच्या नक्कीच विकास करण्याची ग्वाही हजारो भाविकांच्या उपस्थितीत दिलाने भाविकां मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी प्रवचन कार सुश्री किशोरी राधीकाश्रीजी, झापरागड पाहडीचे पुजारी मुरलीधर गुरनुले,सरपंच कुंती बाई हुपुंडी,प्रा देवराव गजभिये, आंनद चौबे, रामकुमार नाईक,सुरेश काटेंगे, विरेंद्र आंदे,तिलक सोनवानी,आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना गजबे म्हणाले या ठिकाणाचा विकास करण्यासाठी पाणी हे नितांत आवश्यकता आहे यासाठी स्थानिक विकास निधी मधून बोर मारून हात पंप बसवून देण्याची हमी दिली व पहाडी वरती दोनशे फूट पाणी चढवण्यासाठी सोलर पंप बसवून देण्यात येईल असेही सांगितले आणि पाहळी वरती विद्युत पुरवठा नेण्यासाठी खूप अडचणीचे असल्याने सोलर वरती विद्युत प्रवाह सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गजबे आणि सांगितले तसेच मुख्य रस्त्यापासून पहाडापर्यंत जाण्यासाठी रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही 22 जानेवारी शिव महापुराण कथा हप्ताहात दिली यावेळी शिव महापुराण सप्ताहाचा सहावा दिवस असल्याने तालुक्यातील नागरिक व छत्तीसगड राज्यातून आलेले भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.