श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
नागभीड,दि.२३/०१/२०२३
नागभीड तालुक्यातील नवेगांव(पांडव)गाववाशियांचा स्तुत उपक्रम.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगे बाबा यांचा स्वच्छतेचा मुलमंञ जोपासण्या साठी शासन स्तरावर स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी दर वर्षी लाखो रुपये खर्च करण्यात येते.तरीही या अभियानाचा फज्जाच उडालेला दिसुन येते.पण एखाद्या गाववाशियांनी आपले गाव स्वच्छ करायचे हि बाब मनात ठरवली की, लोकसहभागातुन अख्खे गाव माञ स्वच्छ होत असते.याचे उदाहरण म्हणजे नागभीड तालुक्यातील नवेगांव (पांडव)या गावावाशियांचे घेता येईल, गावासाठी आपले काही देणे लागते,गाव निटनिटके राहीले तर उत्तम आरोग्य आबादीत राहील.हा मुख्य उदेश मनात धरुन गेल्या दहा वर्षा आधी नवेगांव (पांडव) येथिल जेष्ठ नागरीक एकञ येऊन गाव स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला. ही प्रथा काही वर्ष चालविली.जेष्ठांची संख्या कमी होत गेल्याने ही परंपरा खंडीत झाली.परंपरा सुरु ठेवण्यासाठी गेल्या दोन वर्षआधी गावातील युवक एकञ येऊन गुरुदेव मंडळाची स्थापना केली. त्याचबरोबर गावात शांतता व धार्मिक वातावरण निर्माण व्हावे यासाठी भागवत सप्ताह,ग्रामगिताप्रणीत ग्राम महायज्ञ असे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन सुरु केले.या माध्यमातून बालक व तरुणांना भावी आयुष्यासाठी योग्य दिशा मिळावी व त्यांचे जिवन सार्थकी लागावे हा उदेश मनाशी बाळगुन येथिल युवकांनी गावात स्तुत उपक्रम राबवित आहे. सकाळी पहाटे उठुन हाथात झाडु घेऊन गावातील रस्ते व बसण्या उठण्याचे चौक स्वच्छ करण्याचे काम हाथी घेतले. त्या मध्ये संतोष रडके, बाबुराव पांडव,श्याम पानसे,दामोधर पांडव,गिरीष नवघडे,ज्ञानेश्वर बोरकुटे,टेमदेव नवघडे,गजानन कोहपरे,अरुण पांडव,थामदेव बोरकुटे,खुशाल सहारे,अतुल पांडव,प्रशांत पांडव,सम्राट,अनिकेत मशाखेञी,सचिन मशाखेञी,वेद नवघडे,अक्षय बोरकुटे,ललीत बोरकुटे,श्रीकांत मशाखेञी,आशीष बोरकुटे,कृणाल बोरकुटे,गौरव ठाकरे,रितिक बोरकुटे.या युवकांचा समावेश आहे.