श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
तळोधी बा,दि.२३/०१/२०२३
तळोधी बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नागपूर – मूल हायवे वरील सावरगावच्या बस स्टॉप जवळ आज दुपारी 2:30 वाजता मूल कडून नागपूरकडे जाणारी मा दुर्गा ट्रॅव्हल्स क्रमांक एम.एच.49जे.0916 ने दुचाकी क्रमांक 34 व्ही 36 99 ला मागून धडक दिल्यामुळे चंदू रामजी बोरकर वय पन्नास वर्षे हा गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला तात्काळ ब्रह्मपुरी येथील आस्ता रुग्णालयात भरती करण्यात आले . मात्र उपचारादरम्यान त्याचे मृत्यू झाले.
यापूर्वी सावरगाव येथील बस स्टॉप वर 12 जानेवारीला गावातील युवक, कैलास कुकसू गेडाम वय 35 वर्ष हा भरदार टिप्परच्या अपघातात जागीच ठार झाला होता. त्यानंतर टिप्पर चालक टिप्पर घेऊन सिंदेवाही च्या दिशेने पडून गेला होता. लोकांनी पाहून सुद्धा तो टिप्पर पोलिसांना मिळाला नाही.
मात्र त्यानंतर गावातील संतप्त जमावाने सलग अडीच तास संतप्त लोकांनी रस्ता जाम करून ठेवलेला होता.
विशेष म्हणजे काही दिवसापूर्वी 18 डिसेंबर ला गावातील सेवकराम सावरकर या इसमाचा सुद्धा भरधाव वाहनाने टक्कर मारल्यामुळे मृत्यू झालेला होता.
अशा प्रकारे सावरगावात एका महिन्यात रस्त्या अपघातात तीन व्यक्ती मृत्यू पावले यामुळे हा नव्याने बनविण्यात आलेला रस्ता मात्र लोकांसाठी काळच ठरत आहे. या रस्त्यावर गावामध्ये गतिरोधक व संपूर्ण गाव ओलांडेपर्यंत रस्ता दुभाजक करण्यात यावा अशी लोकांनी मागणी केलेली आहे.
लोकांनी रस्ता ओलांडताना सावधानता बाळगावी व दोन्ही बाजूला पाहूनच रस्ता ओलांडावा असे तळोधी बा. पोलीस स्टेशन चे ठाणेदार बी.आर. शेंडे यांनी सूचित केले आहे.