श्री.विलास ढोरे,वडसा तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
देसाईगंज,दि.०१/०२/२०२३
स्थानिक देशाच्या विकासात रासेयो स्वयसेवकांनी महत्वाचे योगदान आहे. तथा भारत हा खेडयांचा देश असल्याने ग्रामिण भागाचा विकास साधायचा असल्यास युवकांनी समोर यावे व समाज जागृती केले पाहिजे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा कार्यकारी प्राचार्य डॉ. सुनिल चौधरी यांनी मौजा शिवराजपूर येथे मोहसीनभाई जव्हेरी महाविद्यालय अंर्तगत श्रमसंस्कार रासेयो निवासी शिबीराच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी मनोगत व्यक्त केले.
शिबीराचे उदघाटन मा. विजय बन्सोड, माजी केंद्रप्रमुख तथा गटसमन्वयक, प्रमुख अतिथी सौ सुषमा सैयाम सरपंच, श्री. प्रमोद झिलपे ग्रा. पं. सदय, हेमंत दर्वे पोलीस पाटील, डॉ. नाजीम शेख, डॉ. दिप्ती इंगोले, डॉ माशिष सेलोकर, योगीराज तुपट प्रामुख्याने व्यासपिठावर उपस्थित होते. याप्रसंगी उदघाटन मा. विजय बन्सोड यांनी सुध्दा स्वयसेवकांना मागदर्शन करतांना खेडयांचा विकास साधायचा असेल तर रासेयो स्वयंसेवकांनी आर्मनिभर होवुन जनगागृती करणे व ग्रामस्वच्छेचे घडे देणे आवश्यक आहे. असे मत व्यक्त केले.
कार्यकमाचे सुत्रसंचालन प्रा. श्रीकांत घोटे, प्रास्ताविक प्रा. प्रविण पत्रे सडकार्यक्रम अधिकारी रासेयो व आभार प्रदर्शन डॉ. चंद्रकात शेंडे कार्यक्रम अधिकारी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. पंकज चौधरी, डॉ. कुशल लांजेवार, प्रा. कुणाल हिवसे, प्रा. सुचिता पेहिवार, डॉ. गौरव निबांतें, प्रा. सत्यनारायण पुसाला, प्रा.सचिन लोणारे, प्रा. रामकृष्ण येरोजवार, प्रा. कु. झोया सैयद प्रा. संतोष पचारे, श्री. संजय बुराडे, – अटालकर, रवि जिवतोडे, नितीन पाथोडे, महेन्द्र घोडेस्वार, नंदकिशोर चंडादे, श्री. कपिल ढोरे, सतिश कोलावार, सतिश मेश्राम, प्राध्यापक बंद शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी अथक परिश्रम केले.