तृतीयपंथीयांच्या समस्यांच्या तक्रारी निवारण समितीवर सदस्यत्वासाठी अर्ज करण्याचे आवाहन

assistant commissioner-,social-waork-department-for-transgender-welfare
assistant commissioner-,social-waork-department-for-transgender-welfare

जिल्हा माहिती कार्यालय ,गडचिरोली 

गडचिरोली, दि.10 

राज्यातील तृतीयपंथीयाच्या कल्याणासाठी व त्यांच्या हक्काचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने तृतीयपंथी हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळ स्थापन करणेबाबतचा मुद्दा तिस-या महिला धोरणामध्ये समाविष्ठ आहे. तृतीयपंथी/ ट्रॅासजेंडर हा समाजातील एक दुर्लक्षित घटक असुन या घटकास समाजाकडुन सापत्न व भेद भावाची वागणुक दिली जाते. नेहमीच भेदभाव, सापत्न वागणुकी मुळे समाजातील हा घटक विकास प्रक्रियेपासुन दुर्लक्षित राहिलेले आहे. त्यामुळे या समाज घटकांचे शासना मार्फत मुलभुत अधिकारांचे संरक्षण करुन त्यांना विकासाची समान संधी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र. तृतीय-2018 प्र.क्र.26/सामासु दि. 07/10/2020 अन्वये जिल्हयातील तृतीयपंथीय यांच्या तक्रारीचे / समस्यांचे जिल्हास्तरावर तक्रार निवारण होणे आवश्यक आहे. या करीता जिल्हास्तरावर तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली आहे. सदर जिल्हास्तरीय समितीवर सामाजिक क्षेत्रात काम करणारी एक एक व्यक्तीची नेमणुक करावयाची आहे. यासाठी सामाजिक क्षेत्रात काम करणा-या इच्छुक संबंधित व्यक्तीनी दिनांक 27 फेब्रुवारी 2023 पर्यत अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले आहे. newsjagar 

या जिल्हास्तरीय समितीवर सामाजिक क्षेत्रात काम करणारी एक व्यक्ती सदस्यांची नव्याने समावेश करुन समितीचे पुनर्गठन करण्यात येणार आहे. त्याकरीता सामाजिक क्षेत्रात काम करणा-या इच्छुक व्यक्तींनी, गडचिरोली जिल्हातील संबंधीत व्यक्तीनी सहाय्यक आयुक्त् समाज कल्याण गडचिरोली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, एल.आय.सी.ऑफिस रोड आयटीआय चौक, गडचिरोली-442605 या पत्त्यावर किंवा कार्यालयाचा संपर्क क्र. 07132-222192 वर संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण गडचिरोली यांनी केले आहे .