श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
मूल,दि .१०/०२/२०२३
सिंदेवाही ते मूल मार्गावरील
सरडपार येथील पुलाजवळ दुचाकीला एका अज्ञात चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एक तरुण व तरुणी जागीच ठार झाले तर दुचाकीवरील तिसरा तरुण गंभीर जखमी झाला. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. हा अपघात गुरुवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास घडला. घटनेनंतर लगेच जखमी व मृतकांना सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. घरी खोटे सांगून चॉकलेट डे Chocolate Day साजरा करण्याकरिता हे तिघेही सिंदेवाहीला गेले होते. तेथून परततांना हा अपघात झाल्याची गावात चर्चा आहे. hit by unknown vehicle ,2 death 1 injured
सेजल अनिल कुंभारे sejal kunbhare (19) रा. राजोली ता. मूल व सुमित राजू अलोणे sumit alone (23) रा. डोंगरगाव ता. सिंदेवाही अशी मृतकांची नावे आहे. तर अक्षय यादव लेनगुरे Akshay Lengure (23) हा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने राजोली व डोंगरगाव गावावर शोककळा पसरली आहे. सध्या व्हॅलेंटाइन वीक सुरु असून गुरुवारी चॉकलेट डे होता. यानिमित्ताने तिघेही घरी खोटे सांगून दुपारी 4 वाजता घराबाहेर पडले. सेजल ही मूल येथे नर्सरीचे शिक्षण घेत आहे. तिने आपल्या कुटुंबीयांना आपण मूल येथे जात असल्याचे सांगितले, तर सुमित आणि अक्षय यांनी आपण चंद्रपूरला मुक्कामी जात असल्याचे सांगितल्याची गावात चर्चा आहे. मात्र हे तिघेही सिंदेवाही येथे चॉकलेट साजरा करण्यासाठी गेले होते. चॉकलेट डे साजरा करुन रात्री 8.30 वाजताच्या सुमारास तिघेही जण सिंदेवाही येथून दुचाकीने आपापल्या गावाकडे परतत असताना अवघ्या 6 कि. मी. अंतरावरील सरडपारजवळ भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात सेजल आणि सुमित गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी रक्ताचा सडा पडलेला होता. घटना होताच त्या मार्गाने जाणाऱ्या लोकांसह व सरडपार sardpar येथील नागरिकांनी लगेच सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात येथे हलविले.
अक्षयची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात नागरिकांची चांगलीच गर्दी झाली होती. अधिक तपास सिंदेवाही पोलिस करीत आहेत.