श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
ब्रम्हपुरी,दि.०९/०२/२०२३
सार्वजनिक न्याय नोंदणी कार्यालय चंद्रपूर द्रारे लोकमान्य टिळक वाचनालय ब्रह्मपुरी येथे सामूहिक सर्व धर्मीय विवाह सोहळ्यानिमित्त सभेचे आयोजन करण्यात आले होते. सामूहिक सर्व धर्मीय विवाह सोहळा निमित्याची सभा मा. दत्तू कात्यायन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.सभेला प्रमुख अतिथी म्हणून अँड. शोभाताई पोटदुखे अध्यक्ष सामूहिक सर्वधर्मीय विवाह सोहळा चंद्रपूर, अँड.आर.एन ढोक, अँड. एम.जे. काकडे, श्री आर.एन. मडावी (निरीक्षक ),आर .आर. उपासे (निरीक्षक )सार्वजनिक न्याय नोंदणी कार्यालय चंद्रपूर व ब्रह्मपुरी तालुक्यातील विविध संस्थेतून प्रतिनिधी उपस्थित होते. या सभेत सामूहिक विवाह सोहळा समितीचे वरील मान्यवर सर्व संस्थेला सहभाग घेण्याकरिता आमंत्रित केले आहे. संस्थेतर्फे आर्थिक सहकार्य किंवा विवाह करू इच्छित असलेले नव वर -वधू शोधण्याकरिता सहकार्य करण्यास विनंती केली आहे. विवाह नोंदणी फार्म ख्रिस्तानंद रुग्णालय(सॅम जोसेफ), लोकमान्य टिळक(राजू देऊळकर) वेळ सकाळी 08ते11 व सायंकाळी 5 ते 8या वेळेमध्ये उपलब्ध करण्याची माहिती दिली, नोंदणीची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2023 पर्यत आहे. Newsjagar