श्री.नंदकिशोर वैरागडे,विशेष प्रतिनिधी गडचिरोली जिल्हा ,न्यूज जागर
कोरची,दि. ११/०२/२०२३
येथील वनश्री कनिष्ठ महाविद्यालयात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनीत माध्यमिक खुल्या गटातून, भिमपूर येथील युवास्पंदन विद्यालयातील 10 व्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनीने सादर केलेल्या स्मार्ट हॉस्पिटल ला द्वितीय क्रमांक मिळाला. तसेच याच शाळेतील विज्ञान शिक्षक निलकमल बिंझलेकर यांनी शिक्षक गटात सादर केलेल्या विज्ञान शैक्षणिक साहित्य व त्याचा वापर याला प्रथम क्रमांक तर याच शाळेतील प्रयोगशाळा सहाय्यक नितेश कराडे यांनी सादर केलेल्या शैक्षणिक साहित्य चुंबकाचे प्रकार आणि त्याचे उपयोग याला सुद्धा प्रथम क्रमांक मिळाला आहे.
यशाचे श्रेय मुख्याध्यापिका सुषमा कराडे विज्ञान शिक्षक बिंझलेकर व शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिला. Newsjagar