वेल्डिंग करीत असताना स्कूल व्हॅन जळून नष्ट, सुदैवाने कुठलीही जिवीत हानी झाली नाही

school-van-burne-at-korchi

श्री.नंदकिशोर वैरागडे,विशेष प्रतिनिधी गडचिरोली जिल्हा ,न्यूज जागर 

कोरची,दि.११/०२/२०२३

कॅब्रिज केरला माॅडेल स्कूलच्या मुलांना ने आन करणारी स्कूल व्हॅन मध्ये बिघाड झाल्याने चेंबर चा नट निघत नसल्याने वेल्डिंग करुन काढण्या प्रयत्न नट काढल्या नंतर अचानक लागलेल्या आगीत स्कूल व्हॅन जळून नष्ट झाल्याची घटना सायंकाळी 7.45 च्या दरम्यान गायधने वेल्डिंग वर्क शॉप मध्ये घडली असूनध सुदैवाने कुठलीही जिवीत हानी झाली नाही.

शिवा गॅरेज मध्ये चेंबरचा काम करण्यासाठी आलेल्या कॅब्रिज केरला माॅडेल स्कूलच्या व्हॅन एम एच-49 जे 0231 चेंबर नट निघत नसल्याने वेल्डिंग करून काढण्याचा प्रयत्न करून काढण्यात. आले चेंबर खाली असल्याने राजु गायधने गाडीच्या खाली झोपुन वेल्डिंग काम केले चेंबरचे नट काढून बाहेर निघाल्या नंतर स्कूल व्हॅनला अचानक आग लागली पेट्रोल गाडी असल्याने आग खूप लवकर रौद्र रूप धारण केले होते 30 मिनिटांमध्ये गाडी जळून खाक झाली होती  कोरची नगरपंचायत मध्ये असलेल्या अग्निशामक वाहन नादुरुस्त असल्यामुळे नागरिकांनीच अग्निशामक यंत्रणेचे काम केले.