डॉ सुकेशीनी बोरकर (बनसोडे) यांना जिजाऊ पुरस्कार प्रदान

श्री.नंदकिशोर वैरागडे,विशेष प्रतिनिधी गडचिरोली जिल्हा ,न्यूज जागर 

कोरची,दि. १२/०२/२०२३

कलाविष्कार साहित्य व संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य व कलाविष्कार कला, क्रीडा व बहुउद्देशीय शिक्षण संस्था भगोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आंबेडकरी संमेलन दि. २९ जानेवारी २०२३ ला मुर्तीजापुर येथे पार पडले. ब्रह्मपुरी येथील डॉ. सुकेशिनी बोरकर (बन्सोड) यांना ‘जिजाऊ पुरस्कार देण्यात आला’.
सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कारजाहीर करण्यात आला. आपल्य यशाचे श्रेय त्यांनी कलाविष्काराच संस्थापक मिलिंद इंगळे, आई सुमन बोरकर, मामा प्रमोद मोटघरे यांना  दिले. सदर पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल श्रीफळ असे आहे. कार्यक्रमस्थळ उद्घाटक डॉ. बबन जोगदंड संमेलनाध्यक्ष पं. भीमराव पांचाळे स्वागताध्यक्ष सुगत वाघमारे उपस्थित होते.