मातोश्री लक्ष्मीबाई आश्रमशाळा कानपा येथे पालकमेळावा तथा स्नेहसंमेलन

श्री.अरुण बारसागडे ,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर 

नागभीड,दि.१२/०२/२०२३

मातोश्री लक्ष्मीबाई आश्रमशाळा कानपा येथे पालकमेळावा तथा स्नेहसंमेलन सोहळा साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष गजानन पाथोडे संस्था अध्यक्ष तथा संचालक जि. म. बँक चंद्रपूर हे होते, तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक शरद चौधरी कार्यालयीन अधीक्षक ए आ वि प्र चिमूर हे होते त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून सौ.रेखाताई ब्राम्हणकर संस्था सदस्य, वटाणे ,गायना, पंडित ,निखारे ए आ वि प्र चिमूर, कु. डॉ.ममता पत्रे वैद्यकीय अधिकारी नवेगाव पांडव, सौ. कुंदाताई कातले सरपंच कानपा, महादेव देवाडे उपसरपंच कानपा ,सौ.पौर्णिमा रामटेके,सौ ज्योती मेश्राम ग्राम.पं. स.कानपा हे उपस्थित होते.या कार्यक्रमा निमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे मूल्य समजावून सांगितले तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन केले तसेच प्रमुख मार्गदर्शक डॉ पत्रे मॅडम यांनी आरोग्याविषयी मार्गदर्शन केले तसेच श्री वटाणे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले, त्याचप्रमाणे सौ.रेखाताई ब्राम्हणकर यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री .खुणे सर यांनी केले व प्रास्ताविक श्री शेख सर यांनी केले तर आभारप्रदर्शन जिभकाटे यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तथा विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.newsjagar