गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
गडचिरोली,दि.१२/०२/२०२३
मोदी सरकार ने आणलेल्या उज्वला योजनेचे धुरमुक्त गॅस कनेक्शन योजनेस पात्र असलेल्या नागरिकांचे फार्म ऑनलाईन अर्ज करून सुद्धा वारंवार त्रास देणाऱ्या गडचिरोलीतील सर्व गॅस एजन्सी वर फोजदरी गुन्हे दाखल करा अशी मागणी रुपेश वलके राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष यांनी केली आहे ,
गडचिरोलीतील सर्व गॅस एजन्सी मध्ये अजूनही अनेक गोर गरीब रेशन कार्ड धारकांचे ऑनलाईन अर्ज भरून ठेवून त्या नागरीकांना या योजनेचे गॅस कनेक्शन न देता वरून मुजोरी करणाऱ्या अशा सर्व गॅस एजन्सी च्या येत्या महिना भरात सखोल चौकशी करून वर फोजदारि गुन्हे दाखल करा अंन्यथा गडचिरोली तहसील समोर आंदोलन करू असाही इशारा श्री, वलके यांनी दिला आहे.
यावेळी त्यांच्यासोबत मुझाहिद पठाण , शकीलाताई पठाण , रुपाली वलके , खतीजा शेख मयूर जुवारे विनोद सहारे हेमराज लांजेवार विवेक कांबळे सूरज मडावी प्रदीप चिंचोलकर अक्षय मेश्राम अजय मेश्राम राकेश पिपरे चंद्रशेखर मेटे बाबूलाल रामटेके ओमप्रकाश मेटे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते . newsjagar