श्री.नंदकिशोर वैरागडे,विशेष प्रतिनिधी गडचिरोली जिल्हा , न्यूज जागर
कोरची,दि,१४/०२/२०२३
बहुल आदिवासी म्हणुन माहाराष्ट्र टोकावर व छत्तीसगढ़ लागुन कोरची तालुका म्हणुन ओळखला जातो. कोरची तालुक्यात आदिवासी गोंड समाज क्षेत्र मोहगांव येथे दिनांक 11/02/2023 रोजी शनिवारला सभा घेवुन दुपारी बारा वाजता आदिवासी गोंड समाजाची सभा घेऊन महाशिवरात्रि कार्यक्रमाबाबत चर्चचा करण्यात आली., नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची कार्यकारणी गठीत करण्यात आली. त्या बैठकीत सर्वानुमते अध्यक्ष म्हणुन अजय सोरी बहिटेकला, .उपाध्यक्ष – रामजी कुंजाम बेतकाठी . कोषाध्यक्ष कार्तिक नैताम मोहगांव ,,सल्लागार – सुरेश सिंद्राम टेंमली, सल्लागार -गोपाल मडावी भिमपूर, सचिव -प्रकाशसिंह नैताम बेतकाठी, सहसचिव सुबित मडावी मोहगांव, सल्लागार दुर्जन मडवी बेडगांव ,आदीची सर्वानुमते निवड करण्यात आली .व. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.नवनिर्जीत पदाधिकाऱ्यानी अध्यक्षीय भाषणात म्हणाले की समाजानी एकत्र येऊन समाजासाठी लढा दिला पाहिजे जर समाजावर अन्याय झाला तर खपवून घेणार नाही असे नवनिचित अजय सोरी अध्यक्ष अध्यक्षीय स्थानावरून बोलत होते. News Jagar
या सभेत कोरची तालुक्यातील मोहगांव,टेमली,भिमपूर,बेतकाठी, नांदळी, खुणारा,बहिटेकला,,बोटेकसा,बेडगांव,राजाटोला,मसेली,कोरची,कोहका, आदि गावातील महिला पुरूष उपस्थिति होते.