गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
गडचिरोली,दि.२०/०२/२०२३
आदिवासी एकता युवा समिती गडचिरोली द्वारा स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती क्रांतीसुर्य बिरसा मुंडा चौक गडचिरोली येथे साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रम संघटनेचे अध्यक्ष उमेशभाऊ ऊईके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून संघटनेचे कोषाध्यक्ष वासुदेवभाऊ कोडापे, सागरभाऊ भांडेकर आदि उपस्थित होते.
यांवेळी सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन जय भवानी जय शिवाजी च्या जयघोषाने पुजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या संकल्पनेला आत्मसात करून सर्व समाज घटकांनी एकत्र येऊन छत्रपतीच स्वप्न पुर्ण करण्याची आज आवश्यकता असल्याचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन संघटनेचे सचिव प्रदीप कुलसंगे यांनी केले. तर आभार प्रदर्शन मंगेश नैताम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता प्रफुल कोडाप, आकाश कोडाप, गिरीष ऊईके, वैभव वडेट्टीवार, राज ठाकरे, आशिष ठाकरे, सुमित फुलझले, प्रसाद कायरकर आदि युवक कार्यकर्ते उपस्थित होते. newsjagar