जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये शेडमाके विद्यालय तृतीय स्थानी

चामोर्शी तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर 

चामोर्शी,दि.२०/०२/२०२३

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय आष्टी येथे पंचायत समिती चामोर्शीच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये शहीद बाबुराव शेडमाके माध्यमिक विद्यालया आमगाव ( म) च्या प्रतिकृतीला तृतीय क्रमांक मिळाला.
दिनांक 14 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी 2023 या कालावधीत जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. यात तालुकास्तरातील क्रमांक प्राप्त प्रतिकृती या प्रदर्शनी मध्ये ठेवण्यात आल्या होत्या .
शाळेचे प्राचार्य अनिल गांगरेड्डीवार यांचे मार्गदर्शनाखाली विज्ञान शिक्षक सुवेंदू मंडल, प्रकाश निमकर, पुरुषोत्तम गुरुनुले, विशाल मंडल यांनी वर्ग नववीचे विद्यार्थी अमित दिलीप मलंगी आणि दिशांत रुपेश तुरे या विद्यार्थ्यांनी “रुग्ण व डॉक्टर यांना मदत करणारे यंत्र ” ही प्रतिकृती प्रयोगासाठी ठेवलेली होती. या प्रतिकृतीच्या प्रयोगामुळे एखाद्या रुग्णाची सलाईन संपल्यावर रक्त सलाईन मध्ये मागे न जाता ऑटोमॅटिक बंद होते त्यामुळे रुग्णांना कोणत्याही प्रकारचे नुकसान सहन करावे लागणार नाही .या मॉडेलची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये तृतीय क्रमांक व विज्ञान प्रश्नमंजुषेमध्ये अमित मलंगी याला तृतीय क्रमांक मिळाल्याबद्दल वन वैभव शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष जमीर हकीम (बबलू भैय्या ) तसेच अबूजमाड शिक्षण संस्थेचे सचिव समशेरखाँ पठाण यांनी विद्यार्थ्यांचे व विषय शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन केले.
तसेच शाळेचे प्राचार्य अनिल गांगरेडीवार, नरेंद्र चिटमलवार, अनिल निमजे, गजानन बारसागडे, चंदू सातपुते ,अभिषेक ढोंगे, रोशन वासेकर, रुचिता बंडावार, निशा रामगुंडे यांनी विज्ञान शिक्षक व सहभागी विद्यार्थी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले newsjagar
या यशाबद्दल पालक वर्ग व गावकरी यांनी मार्गदर्शक शिक्षक तसेच विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक कौतुक व अभिनंदन केले.