बोमनवार विद्यालयाच्या स्काऊट – गाईड विद्यार्थ्यांनी केली दिव्यांगाची सेवा

By Amit Sakhare

चामोर्शी – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त जिल्हा परिषद व जिल्हा सामान्य रुग्णालय ,गडचिरोली यांच्या विद्यमाने ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे दिनांक 3 मार्च 2023 रोजी दिव्यांगाचे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
यानिमित्ताने जा. कृ. बोमनवार विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, चामोर्शी येथील स्काऊट – गाईड विद्यार्थ्यांनी दीव्यांगाची सेवा केली.
या शिबिरात स्काऊट – गाईडने दिव्यांगाना व्हील चेअरवर बसवून विविध तपासणी विभागाकडे नेणें,त्यांचे फॉर्म भरण्यास मदत करणे, दीव्यांगाणा वाहणा पर्यंत पोहचवून देणे,दिव्यांगाणा वेगवेगळ्या विभागाची माहिती देणे,गर्दीच्या ठिकाणी दिव्यंगाणा रांगेत लावणे, वैद्यकीय अधिकारी,आरोग्य कर्मचाऱ्यांनी सांगितलेली कामे करणे,इत्यादी कामे स्काऊट – गाईडचे स्काऊट मास्टर – घनश्याम मनबत्तूलवार यांच्या नेतृत्वात केले.
स्काऊट – गाईड विद्यार्थ्यांच्या या सेवाभावी कार्याचे आरोग्य विभागाचे अधिकारी,कर्मचारी,रुग्ण तथा त्यांचे सहकारी , पंचायत समिती चे संवर्ग विकास अधिकारी, केंद्रप्रमुख श्री हिम्मतराव आभारे, विद्यालयाचे प्राचार्य,संस्थेचे पदाधिकारी ,शिक्षक वृंद यांनी कौतुक केले.