श्री.भुवन भोंदे,प्रतिनिधी,न्यूज जागर
देसाईगंज,दि.०५/०३/२०२३
भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली च्या वतीने बुथ रचना सशक्तिकरण अभियान अंतर्गत
शक्तीकेंद्रप्रमुख /शक्तिकेंद्र विस्तारक जिल्हा प्रशिक्षण वर्ग
आदर्श महाविद्यालय वडसा (देसाईगंज) येथे आयोजित प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले. या प्रशिक्षण वर्गाला खासदार अशोकजी नेते यांनी मार्गदर्शन करतांना बुथ प्रमुख, शक्ती केंद्र हा भारतीय जनता पार्टीचा कणा व आत्मा आहे. या कण्याला शक्ती द्यायचं काम शक्तीकेंद्र प्रमुख करित असते.एकीकडे सर्व पक्ष एकत्रित येऊन भारतीय जनता पार्टी सोबत लढा देण्याचे काम करित आहे. तरीपण भारतीय जनता पार्टी या सर्व पक्षांना लढा देऊन जगामध्ये विश्वामध्ये एक नंबर चा पक्ष बनवण्यासाठी व भारतीय जनता पक्षाला एक शक्तिशाली आणि सर्वात मोठा राजकीय पक्ष बनवण्यात कार्यकर्त्यांचे मोठे योगदान आहे. यासाठी केंद्रप्रमुख आणि बूथ स्तरावरील कार्यकर्ते हा भारतीय जनता पक्षाचा कणा व आत्मा आहे.असे प्रतिपादन खासदार अशोकजी नेते यांनी शक्तीकेंद्र विस्तारक जिल्हा प्रशिक्षण वर्गाप्रसंगी केले.
खासदार महोदयांनी पुढे बोलतांना केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची सविस्तर माहिती देतांना ते म्हणाले की, केंद्र सरकारने सर्वसामान्यांच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या आहेत.आयुष्मान भारत योजना, उज्ज्वला योजना, जल जीवन मिशन,आवास योजना,बेटी बचाव बेटी पढाव,जनधन योजना, किसान सन्मान निधी योजना,मुद्रा लोन,अशा अनेक योजना केंद्र सरकार राबवत असल्याचे सांगितले.ज्याचा थेट लाभ सर्वसामान्यांपासून बेरोजगार तरुणांना मिळत आहे.असे खासदार महोदयांनी मार्गदर्शन केले.
भारतीय जनता पार्टी संघटनात्मक,विस्तारक जिल्हा प्रशिक्षण वर्ग आदर्श महाविद्यालय वडसा (देसाईगंज) येथे मोठ्या थाटात प्रशिक्षण वर्ग साजरा करण्यात आला.यावेळी प्रामुख्याने विदर्भ संघटनमंत्री डॉ.उपेंद्रजी कोठेकर,खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते,जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवते, आमदार डॉ. देवराव होळी,आमदार कृष्णाजी गजबे,सहकार महर्षी तथा ज्येष्ठ नेते प्रकाश सा.पोरेड़्डीवार प्रद़ेश सरचिटणीस एस.टी मोर्चा चे प्रकाश जी गेडाम,जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री प्रशांतजी वाघरे,जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा,युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेवजी फाये,जिल्हा संपर्क प्रमुख सदानंदजी कुथे,माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे,माजी नगराध्यक्ष शालुताई दंडवते तालुकाध्यक्ष राजु जेठानी,तालुकाध्यक्ष नंदुभाऊ पेट्टेवार,युवा मोर्चा अध्यक्ष पंकज खरवडे तसेच जिल्ह्यातील अनेक भाजपा पदाधिकारी, बुथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख,कार्यकर्ते, प्रशिक्षण वर्गाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.