चामोर्शी तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
चामोर्शी,दि.०९/०३/२०२३
येथील शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व नेहरू युवा केंद्र गडचिरोली यांच्या संयुक्त विदयमाने ८ मार्च रोजी महिला दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयातील प्रा.शिल्पा काशेट्टीवार होत्या.तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिव कल्याण संस्थेचे अध्यक्ष अनुप कोहळे आणि गडचिरोली नेहरु युवा केंद्र, चामोर्शी तालुका समन्वयक, कल्याणी गायकवाड होत्या. महाविद्यालयातील कर्मचारी भावना सूर, भावना झाडे ह्या विचारपीठावर उपस्थित होत्या.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना, गायकवाड म्हणाल्या की,आजची स्त्री समाजातील प्रत्येक क्षेत्रात प्रगतीचे नवे मार्ग निर्माण करताना दिसते.स्त्री म्हणून जगताना अनेक भूमिका पार पाडव्या लागतात.
ह्या भूमिका पार पडताना सामाजिक कर्तव्य आणि सामाजिक कार्य करून स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे असाही संदेश दिला.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शुभांगी मडावी हिने केले,प्रास्ताविक प्रा. नोमेश्र्वर झाडे यांनी केले.तर आभार शितल मार्तीवार हिने मानले.
कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.