चामोर्शी पोलीस स्टेशन येथे महिला दिन

चामोर्शी तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर 

चामोर्शी,दि.०९/०२/२०२३

स्वच्छतेचे काम करणाऱ्या ७ महिलांना साडी चोळी भेट

जागतिक महिला दिना निमित्य पोलीस स्टेशन येथे महिला सफाई कर्मचारी यांना साडी चोळी व नगरपचायतच्या महिला पदाधिकारी व नगरसेविका यांना विविध प्रजातीचे वृक्ष देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.newsjagar
यावेळी कार्यक्रमाला नगरपंचायतच्या नगराध्यक्षा जयश्री वायलालवार , महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी वाघ , महिला व बालकल्याण सभापती गिता सोरते , उपसभापती स्नेहा सातपुते , नगरसेविका प्रेमा आईचवार ,रोशनी वरघंटे , काजल नैताम , सोनाली पिपरे , वंदना गेडाम महिला पोलीस कर्मचारी व महिला स्वच्छता सफाई कर्मचारी उपस्थित होते .
महिलांचे काही समऱ्या असल्यास ते सोडविण्याचे आश्वासन महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी वाघ यांनी दिले  . तर महिला सक्षमीकरणाची गरज असल्याचे नगराध्यक्ष जयश्री वायलालवार यांनी म्हटले .