श्री.नंदकिशोर वैरागडे,विशेष प्रतिनिधी गडचिरोली जिल्हा,न्यूज जागर
कोरची,दि.०९/०२/२०२३
जागतिक महिला दिना निमित्त पोलीस स्टेशन कोरची येथे पोलीस अधीक्षक नीलोत्पल बसू, अप्पर पोलीस अधीक्षक अनुज तारे, अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंता, यांच्या संकल्पनेतून तसेच साहिल झरकर उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा यांच्या मार्गदर्शनाखाली कोरची येथे ०८ मार्च २०२३ बुधवारी “भव्य महिला” मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
सदर भव्य महिला मेळाव्याचे उद्घाटन कोरची नगरपंचायत अध्यक्षा सौ. हर्षलताताई भैसारे यानी केला तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष कोरची पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक अमोल फडतरे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरपंचायत बांधकाम सभापती सौ नीरा परदेशी बघवा, कोरची पो उप नी विठ्ठल सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ता तथा लोकमत पत्रकार राहुल अंबादे, महिला बाल विकास कोरची व्ही आर बुले, मसेली पो पा सौ. विद्या बोगरे, गुटेकसा पो पा सौ शांती हिदामी, झाशीची राणी महिला बचत गट अध्यक्ष सौ अमृता बोगा, सचिव सौ ममता नैताम, कल्याणी महिला बचतगट राजाटोला अध्यक्ष प्रमिला कोल्हे, सौ अनिता सयाम आशा वर्कर मसेली, सौ ललिता शेंडे आशा वर्कर गुटेकसा, तुरसे हिडामी दाईनबाई गुटेकसा, तसेच कोरची हद्दीतील 150 ते 200 महिला उपस्थित होते.
सदर महिला मेळाव्याचे उद्घाटन विध्येचे आराध्य दैवत माता सरस्वती, सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे उपस्थित महिलांच्या हस्ते पूजन करण्यात आले, नंतर सौ हर्षलता भैसारे नगराध्यक्ष यांनी महिलांच्या अधिराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. व्ही आर बुले सा महिला बाल कल्याण यांनी त्यांच्या विभागाचे वतीने सविस्तर मार्गदर्शन केले, लोकमत तालुका प्रतिनिधि तथा सामाजिक कार्यकर्ता राहुल अंबादे यांनी भारतातील पहिल्या महिला उद्योजिका पैकाबाई खोब्रागडे हया कौन होत्या यांनी कशी आपली प्रगती केली याच उदाहरण यावेळी उपस्थित महिलाना दिला. तसेच अमोल फडतरे पोलिस निरीक्षक यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना गुड टच व बॅड टच तसेच लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण सायबर गुन्हे याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले.
उपस्थित विद्यार्थ्यांना शिक्षणात, खेळामध्ये प्रावीण्य मिळविलेल्याना प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व 50 महिलांना भेट वस्तूच्या स्वरूपात नियमित उपयोगी येनारे फायबरचे डब्बे तसेच विविध, क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या (आशा वर्कर, दाईन बाई, महिला बचतगट अध्यक्ष, सचिव) महिलांना प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सर्व महिलाना वृक्षारोपण करण्यासाठी १०० वृक्ष वाटप करण्यात आले, तसेच पोलीस स्टेशन कोरची येथे कार्यरत महिला पो अंमलदार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.newsjaagr
तसेच गणेश फुलकवर सपोनि पो स्टे कोरची यांनी उपस्थित सर्वांना पोलीस दादालोरा खिडकी च्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना विषयी माहिती दिली. सदर महिला मेळाव्यादरम्यान मौजा बोडेना येथील युवक युवतींनी आदिवासी नृत्य सादर केले. सदरचा मेळावा 10:30 वा सुरू करून 15:30 वा शांततेत पार पडला मेळावा दरम्यान उपस्थितांची स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.