आम. आदमी पार्टी. प्रकाश जिवानी जि. उपाध्यक्ष यांची मा. एकनाथजी शिंदे साहेब यांना शेती मालाच्या नुकसानची भरपाई मागणी

श्री.भुवन भोंदे ,प्रतिनिधी,न्यूज जागर 

देसाईगंज,दि.२०/०३/२०२३

अवकाळी पाऊस व गारपीट मुळे झालेल्या शेतमालाच्या नुकसाणीमुळे देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिडण्याकरिता आम आदमी पार्टी ने मा. तहसीलदार साहेब देसाईगंज यांच्या मार्फतेने मा. एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालयात मुबंई 32 यांना निवेदन पाठवण्यात आले.newsjagar

दिनांक:-18/3/2023 ते 20/3/2023 या कालावधीत देसाईगंज व गडचिरोली जिल्यात बऱ्याच ठिकाणी मोठया प्रमाणात गारपीट व अवकाळी पाऊसाने झोदपून टाकले आहे ज्यात भाजी पाला कडधान्य धान मक्का चणा ज्वारी अश्या अनेक प्रकारच्या शेत मालाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. आधीच आर्थिक वीवंचरनेत असलेल्या शेतकरी बांधवाच्या हातातील पिकांची नासाडी झाल्याने शेतकरी पूर्ण कंटाळून आले आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे त्वरित पंचनामे होऊन नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी विनम्र मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे निवेदन देतांनी आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष भारत दहलानी ,शहर अध्यक्ष आशिष घुटके, महिला शहर अध्यक्ष शिल्पा बोरकर देवा भाऊ जांभुडकर शेखर भारापाते, तबरेज खान, इतर कार्यकतेस उपस्थित होते.