श्री.भुवन भोंदे ,प्रतिनिधी,न्यूज जागर
देसाईगंज,दि.२०/०३/२०२३
श्री साईबाबा मंदिर हनुमानवार्ड देसाईगंजच्या वतीने श्रीराम जन्मोत्सवा निमित्य संगीतमय श्रीमद भागवत सप्ताह शुक्रवार २४ ते ३० मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
या निमित्ताने शुक्रवारी दुपारी ४ वाजता घटस्थापना झाल्यावर ४ .३० वाजता पालखी मिरवणूक व शहरातून शोभायात्रा काढली जाईल . २५ व २६ मार्चला प्रवचन, २७ ला कृष्णजन्म , २८ ला श्रीकृष्णाचे क्रीडाचरित्र , २९ ला प्रवचन तर दि. ३० ला सकाळी ६ वाजता साईंच्या मूर्तीचा अभिषेक , १० वाजता हवन ,११.२० वाजेपासून प्रवचन सुदाम्याचे पोहे , कृष्णाचे निजधामागमन आणि श्रीमद भागवत महापुराणाची महापूजा. दुपारी ५.२० वाजता पाहुण्यांचे स्वागत व गोपाळकाला . त्यानंतर ७.३० ते १०.३० वाजेपर्यंत भावीकभक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात येईल.श्रीमद भागवत सप्ताह निमित्ताने उदापुर ब्रम्हपुरी येथील ह.भ.प. देवानंदजी पिलारे महाराज दररोज सायंकाळी ७.३० ते १०.३० या वेळेत भागवतावर प्रवचन करणार आहेत. करिता भाविक भक्तांनी प्रवचनाचा लाभ घ्यावा असे साईबाबा मंदिर समिती , श्री संप्रदाय सेवा समिती व महालक्ष्मी महिला मंडळ यांनी कळविले आहे .