श्री.अमित साखरे,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्युज जागर
चामोर्शी, दि.२४/०३/२०२३
नागरिकाची तालुका प्रशासनाकडे मागणी.
महिलांची धुरापासून मुक्तता व्हावी म्हणून शासनाने घरोघरी सिलेंडर कनेक्शन दिले त्यानुसार सिलेंडरधारक चामोर्शी येथील गॅस एजन्सीकडून तालुक्यातील गावा गावात एजन्सीच्या वाहनाने सिलेंडर पुरविले जात होते मात्र आठवडा भरापासून त्या गॅस एजन्सीला सील लागल्याने गॅसधारकरकांची गॅस साठी अडचण निर्माण झाली असून या समस्येची तालुका प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांमधून कडून मागणी करण्यात येत आहे.newsjagar
तालुका स्थळी अरीहंत गॅस एजन्सी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गॅसधारकरकांना बुकिंग केल्यावर घरपोच सिलेंडर मिळत होते मात्र काही कारणास्तव सदर एजन्सीला सील केल्यामुळे गॅसधारकरकांना मोठ्या अडचणींना तोंड ध्यावे लागत आहे. गॅसवर स्वयंपाक करण्याची महिलांना सवय झाली असून दुसरी पर्यायी व्यवस्था नाही त्यामुळे अचानक अडचण आल्याने गॅसधारकांची मोठी तारांबळ उडाली आहे. तालुक्यात घर तिथे गॅस आहे दररोज या एजन्सी मार्फत वाहने गॅसधारकरकांना सिलेंडर पुरविण्याचे काम करीत होते त्यामुळे गॅसधारकरकाना अडचणी आल्या नाही, आता मात्र मोठी अडचण निर्माण झाली आहे यासाठी तालुका प्रशासनाने पुढाकार घेऊन गॅस सिलेंडरसाठी येणारी अडचण दूर करावी अशी मागणी नागरिकांमधून मागणी होत आहे.