श्री.भुवनदादा भोंदे , प्रतिनिधी,न्यूज जागर
देसाईगंज,दि.२५.०३.२०२३
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द प्रकरण
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी पासुन कश्मिर पर्यंत पदयाञा काढुन केन्द्रातिल भारतीय जनता पार्टीच्या कारभाराचे वाभाडे काढले.सर्व सामान्य लोकांना जागृत करून लोकप्रियता मिळवुन सभागृहात केन्द्र शासनाला कोट्यावधी रुपये भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरून धारेवर धरले असता त्यांना ऐनकेन प्रकारे खोट्या गुन्ह्यात अडकवून दोन वर्षाची सजा ठोठावण्यात येताच न्यायालयाने त्यांना जामीन मंजुर केला असताना घाईगडबडीत त्यांचे खासदारीपद रद्द केले.हा सारासार अन्याय असुन लोकशाही संपविण्याचा विद्यमान केन्द्र शासनाचा डाव असल्याचे स्पष्ट करत देसाईगंज तालुका काँग्रेसच्या वतिने केन्द्रातील भाजपा सरकारचा येथील फवारा चौकात जाहिर निषेध करण्यात आला.newsjagar
सन २०१९ च्या निवडणुकीपुर्वी कर्नाटकातील कोलार येथील सभेत राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात मेहुल चोक्सी,ललित मोदी, निरव मोदी हे आपल्या देशाचे पैसे चोरून पळालेत.यावरून मानहानीच्या प्रकरणात सुरत न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोषी ठरवले. न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून दोन वर्षाची शिक्षा आणि १५ हजाराचा दंड ठोठावला तसेच न्यायालयाने वरील कोर्टात दाद मागण्यासाठी त्यांना ३० दिवसाचा वेळ देऊन जामिनही दिला.असे असताना देखील निर्णयाच्या २७ मिनिटानंतर राहुल गांधी यांची खासदारकी घाईगडबडीत रद्द करून लोकशाही पायदळी तुडविण्याचे काम केले आहे. जातीवाचक शब्दप्रयोग केला नसताना भारतीय जनता पार्टीचे नेते ओबीसींची बदनाम केल्याचा कांगावा करून देशातील समस्त बहुजनांची दिशाभूल करुन केलेले कृत्य लपवण्याचा पाप करीत असल्याने अशा कृत्याचा जाहिर निषेध करत देसाईगंज तालुका काँग्रेसच्या वतिने केन्द्रातील भाजपा सरकारच्या विरोधात घोषणा देत जाहिर निषेध करण्यात आला.
यावेळी गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष छगन शेडमाके,गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नंदु नरोटे,वामन सावसाकडे,तालुका काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र बुल्ले,पिंकु बावणे,नरेश लिंगायत,ओबीसी सेलचे मनोज ढोरे,विलास बन्सोड,जयमाला पेंदाम,पुष्पा कोहपरे,पदमा कोडापे आदी देसाईगंज तालुका काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.