श्री. अमित साखरे ,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
चामोर्शी,दि.२५.०३.२०२३
मौजा पलसपुर ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील आरोपी नामे शंकर रामकृष्ण बिश्वास, वय ३५ वर्ष, हा त्याच्या ताब्यातील महिंद्रा बोलेरो पिकअप हे वाहन निष्काळजीपणे चालवून गणेश दुलाल रॉय यांच्या दुचाकीला धडक देउन मृत्युस कारणीभूत व करिश्मा अशोक विश्वास हिला गंभीर दुखापत केली, सदर आरोपीविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करून मामल्यात साक्षीदाराचे बयाण नोदविण्यात आले. व दोन्ही पक्षाचे युक्तीवादानंतर आरोपी शंकर रामकृष्ण विश्वास यांनी कलम ३०४(अ) २७९, ३३८ भादवी व मोटार वाहन कायदयाचे कलम १८४ नुसार गुन्हा केल्याचे सिध्द झाल्याने चामोर्शी येथील न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी चामोर्शी, श्री एन. डी. मेश्राम यांनी आरोपीस १ वर्ष सक्षम कारावासाची शिक्षा व रूपये १३,०००/- दंड दिनांक २४/०३/२०२३ ला ठोठावले. सदर मामल्यात सरकार पक्षाची बाजु अँड.डि.व्हि. दोनाडकर यांनी सांभाळली.