होय ! आपण क्षयरोग संपवू शकतो – संदिप हूमणे

श्री.भुवनदादा भोंदे,प्रतिनिधी ,न्युज जागर 

देसाईगंज,दि.२५.०३.२०२३

स्थानिक अनिकेत समाजकार्य महाविद्यालय येथे जागतिक क्षयरोग दिन डॉ.मिसार वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालयदेसाईगंज, डॉ.कुंभरे तालुका आरोग्य अधिकारी देसाईगंज यांच्यामार्गदर्शनाखालीमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल थुल यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. डॉ.डी.टी.गजभिये,प्रा.राजेंद्र वालदे,प्रा.दिपकभागडकर,प्रा.डॉ. बाळबुद्धे,डॉ.शोभा भुरभुरे,प्रा.अनिल बनपूरकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक क्षयरोगं दिनसाजरा करण्यात आला. याप्रसंगी स्मीता डोंगर यांनी क्षयरोग म्हणजे काय? त्याची लक्षणे कोणती? त्यावर उपाय योजना, व कोणती काळजी घ्यावी? याविषयी माहिती उपस्थितीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर संदीप हूमणेयांनी क्षयरोगाचे संपूर्ण इतीभूत माहिती विस्तृत सागीतल व “होय आपण क्षयरोग संपवू शकतो” अशी हमीसमाजकार्यमहाविद्यालयाचे विद्यार्थी,यांनाक्षेतकार्याच्यामाध्यमातून एक अभ्यासपूर्ण हमी, दिली. केस स्टडी करतांना क्षयरोग रूग्णांना नियमित औषधी, उपचार, व्यायाम करणे, असा सल्ला शुध्दा दिला. कार्यक्रमाला आरोग्य वर्धीनी,आरोग्य उपकेंद्रकोरेगांव ,कुरुड, सांगवी,समुदाय आरोग्य अधिकारी महाविद्यालयाचे शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, यांनी सहकार्य केले.newsjagar