भारतीय जनता पार्टी चा स्थापना दिन संपन्न

श्री.विलास ढोरे ,वडसा तालुका प्रतिनिधी, न्युज जागर

वडसा , दि. ०६/०४/२०२३

भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त भाजप परिवारातील सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना व पक्षावर मनापासून प्रेम करणाऱ्या जनतेला मनःपूर्वक हार्दीक शुभेच्छा !

प्रथम देश, नंतर पक्ष, शेवटी स्वत:…
हे ब्रीद मनाशी ठेऊन मार्गक्रमण करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा आज स्थापना दिवस!

एका छोट्याश्या सुरुवातीपासून जगातल्या सर्वात मोठ्या राजकीय पक्षापर्यंतचा प्रवास अविस्मरणीय आहे. राष्ट्रसेवा, समाजसेवा व धर्मरक्षा या पक्षाच्या तत्वांसाठी आयुष्य समर्पित केलेल्या कार्यकर्त्यांचा पक्षाला सार्थ अभिमान आहे.

भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित्त आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या जनसंपर्क कार्यालयात भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे तसेच आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी पक्ष स्थापना दिनानिमित्त भारत मातेचे पूजन करून भारतीय जनता पार्टी पक्षाचा ध्वज उभारून मानवंदना दिली.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, आमदार कृष्णा गजबे, तालुकाध्यक्ष राजूभाऊ जेठानी, शालूताई दंडवते माजी नगराध्यक्ष, नरेशजी विट्ठलानी माजी नगरसेवक, दीपकभाऊ झरकर माजी नगरसेवक, सचिन खरकाटे युवामोर्चा तालुकाध्यक्ष, रविभाऊ प्रधान बूथ प्रमूख, मधुकर वैद्य बूथ प्रमूख तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.NEWS JAGAR