प्रेसनोट
वडसा,दि.०६/०४/२०२३
शेतकऱ्यांना खरीप हंगामाचा बोनस म्हणून ज्या ज्या शेतकऱ्यांची नोंदणी आदिवासी विकास माहामंडळ अथवा मार्केटींग फेडरेशन यांचेकडे झालेली आहे मग धान्याची विक्री केली असो वा नसो हेक्टरी १५०००/- (पंधरा हजार रुपये) कमाल दोन हेक्टर पर्यंत रु. ३०,०००/- (तिस हजार) लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात शिंदे-फडणविस सरकार जमा करीत आहे. काही व्यापाऱ्यांनी राज्य शासनाच्या या योजनेची संधी साधून विक्री करीता शेतकऱ्यांच्या ७/१२ ची आदिवासी विकास महामंडळ किंवा मार्केटींग फेडरेशन कडे नोंदणी केली त्यामुळे शेतकऱ्यांच्या बोनसवर देखील अशा व्यापाऱ्यांनी डल्ला मारणे सुरु केल्याच्या तक्रारी येत आहेत. Newsjagar व्यापाऱ्यांनी ही फसवणूक थांबवावी लाभार्थी शेतकऱ्यांनी हा बोनस त्यांना मुळीच देऊ नये ज्या शेतकऱ्यांनी मिळालेला बोनस व्यापाऱ्यांना दिला आहे तो परत घ्यावा. परत न दिल्यास त्या व्यापाऱ्यांविरुध्द जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करावी असे आवाहन मनोज ढोरे जिल्हा सचिव ओबीसी काँग्रेस गडचिरोली यांनी केले आहे. Manoj dhore,