By Amit sakahre
चामोर्शी
जा. कृ. बोमनवार माध्यमिक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात ‘शासकीय योजनांची जत्रा’ अंतर्गत बाहेरगावाहून शिक्षणासाठी शाळेत ये – जा करणाऱ्या गरजू व पात्र 21 विद्यार्थिनींना मानव विकास मिशन अंतर्गत मोफत सायकलचे वितरण नुकतेच करण्यात आले .
याप्रसंगी अध्यक्षस्थानी प्र . प्राचार्य – ईतेंद्र चांदेकर, तर प्रमुख अतिथी म्हणून पालक – शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा – सौ. माधुरी बरलावार, नगरपंचायत चामोर्शीच्या नगरसेविका, शाळा व्यवस्थापन व विकास समिती सदस्या – सौ गीता सोरते , प्राध्या. नमूदेव कापगते आदी मान्यवर उपस्थित होते. cycle distribution at bomanwar school chamorshi
मान्यवरांच्या हस्ते 21 विद्यार्थिनीं लाभार्थ्यांना सायकलचे वितरण करण्यात आले.
मान्यवरांनी विद्यार्थिनींना सायकलने शाळेत नियमित ये – जा करून आपली शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याबाबत मार्गदर्शन केले .
लाभार्थ्यात वर्ग 8 ते 12 च्या विद्यार्थिनी कु. प्राची ओझलवार, कोमल कुंभारे सुमन विश्वास, महिमा कुंभारे, कशीश सूत्रपवार, कविता जगन्नाथ, धनश्री जगन्नाथ ,चैताली भुरसे ,सीमा मेश्राम , प्रणाली कुनघाडकर ,सलोनी कुनघाडकर ,मोनी भांडेकर, प्राजक्ता भोयर, मनीषा शाह, नयना भांडेकर, डेनम सरदार, काजल नैताम, प्रणाली गेडाम, शर्वरी भुरसे, खुशबू खोबे, रागिनी सदाफळे यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे संचालन- प्राध्या. नोमेश उरकुडे, तर आभार प्रदर्शन स. शि . घनश्याम मनबत्तूलवार यांनी केले.
याप्रसंगी विद्यालयातील प्राध्यापक ,शिक्षक ,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.