१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे हस्ते ध्वजारोहण

श्री.अमित साखरे ,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्युज जागर 

दिनांक १ मे २०२३ गडचिरोली 

महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा करण्यात आला सत्कार

१ मे या महाराष्ट्र राज्याच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते तहसील कार्यालय चामोर्शी येथे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी तोडसाम साहेब, तहसीलदार नागटिळक साहेब,,नायब तहसीलदार वैद्य साहेब , नायब तहसीलदार कावळे साहेब,मंडल अधिकारी अतकरे,  यांचे सह प्रमुख अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.newsjagar 

यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळ गडचिरोली अंतर्गत श्रमसाफल्य लोकसंचालित साधन केंद्र चामोर्शी नवतेजस्विनी कार्यक्रम अंतर्गत जेंडर नुट्रेशन या गाव पातळीवर कार्य करणाऱ्या श्री विनायक कुनघाडकर प्रभाकर गव्हारे, श्रीकांत सातपुते, ओमदेव जुआरे, जीवन वासेकर, दशरथ महा, महेंद्र नरोटे यांचा सत्कार करण्यात आला.