बोमनवार विद्यालयात विदयार्थ्यांचा सत्कार, पारितोषिक व प्रशस्तीपत्र बक्षीस वितरण

बोमनवार विद्यालयात १० व १२च्या गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार रोख पारितोषिक व प्रशस्तीपत्र बक्षीस वितरण……..
चामोर्शी:- श्री गुरूक्रुपा समाजसेवी संस्था चामाेर्शी द्वारा संचलित स्थानिक जा क्रु बोमनवार माध्यमिक विद्यालय तथा विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या अम्रुत महोत्सवा निमित्त स्वातंत्र्य दिनाचे अौचित्य सधून स्व. जा. क्रु बोमनवार, गुरूजी, स्व. सौ. संध्याताई दुधबळे, स्व. विल्सन तामदेव दुधबळे, स्व. विद्याताई विजय पालारपवार, यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वर्ग १० व १२ वी फरवरी/ मार्च २०२२ च्या शालांत परीक्षेतील गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष प्र. सो. गुंडावार गुरूजी, प्रमुख अतिथी म्हणून संस्थाध्यक्षा- सौ. छायाताई रविशंकर बोमनवार, सचिव- श्री- रविशंकर जागोबाजी बोमनवार सहसचिव- श्री- निकेशभाऊ गद्देवार , संस्थासदस्य – विजय पालारपवार, अभिषेक बोमनवार, किशोर नायक, नम्रता बोमनवार, शाळा समिती सदस्य – मोरेश्वर चलकलवार, तसेच संतोष दिक्षीत, अखिल पालारपवार, प्र. प्राचार्य- इतेंद्र चांदेकर, सकाळ पाळी प्रमुख- प्राध्या. नमुदेव कापगते, पालक- शिक्षक संघाचे सदस्य आदि मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांनी विद्यादेवता सरस्वती तथा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला दिप प्रज्वलन व माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. इयत्ता १० वी तून कशिश परशुराम गोहने, प्रथम, आयुश प्रदिप एलावार, व्दितीय, समीक्षा प्रविन मोगरे, त्रुतीय क्रमांक पटकावल्याबद्दल ३०००, १९००, १६००रू रोख पारितोषिक देण्यात आले.
इयत्ता१२वी कला शाखेतून सुमित साईनाथ मडावी प्रथम, अमोल तुकडया शिंदेकार – व्दितीय, सेविकांत संजय दुधबावरे त्रुतिय क्रमांक पटकावल्याबद्दल२५००रू, १९००रू, १६००रू रोख पारितोषिक.
इयत्ता १२ विज्ञान शाखेतून सारंग गोपाल मेनेवार- प्रथम, कु. हरिप्रिया प्रकाश गजपुरे- व्दितीय, कु. कु. पल्लवी नमुदेव कापगते- त्रुतिय क्रमांक पटकावल्याबद्दल ४०००रू, १९००रू, १६००रू 💲रोख पारितोषिक देण्यात आले.
संस्थेचे सचिव- रविशंकर जागोबाजी बोमनवार, डाॅ. तामदेव दुधबळे, यांचे कडून इयत्ता १ ०,१२ वी तिल प्रथम, व्दितीय, त्रुतिय क्रमांक प्राप्त विदयार्थ्यांना रोख पारितोषिक, विजय पालारपवार यांचेकडून १२वी सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विदयार्थ्यांस १०००रू प्र. प्राचार्य- इतेंद्र चांदेकर यांच्या कडून १२वी गणीत विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करणा-या विदयार्थ्यांस ५००रू , स. शि. संतोष चावरे यांचे कडून १०वी गणीत विषयात सर्वाधिक गुण प्राप्त विदयार्थ्यांस ५००रू रोख पारितोषिक देण्यात आले.
मान्यवरांच्या हस्ते या गुणवंत विदयार्थ्यांचा, व पालकांचा रोख पारितोषिक, प्रशस्तिपत्र, पुष्पगुच्छ💐 देऊन सत्कार करण्यात आला.
अतिथी नी गुणवंत विदयार्थ्यांचे🌹 कौतुक केले. विदयार्थ्यांनी अधिक मेहनत घेऊन उच्च शिखर गाठावे असे प्रतिपादन केले.
अध्यक्षस्थानी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. विदयार्थ्यांनी ज्ञानाची शिदोरी घेऊन पुढील शैक्षणिक वाटचाल करावी. शाळेचे, कुटूंबाचे व समाजाचे नावलौकिक करावे. असे प्रतिपादन केले.
प्रास्ताविकेतून प्रभारी प्राचार्य- इतेंद्र चांदेकर यांनी शाळेच्या प्रगति विषयी, विविध प्रकारच्या उपक्रमाविषयी माहिती दिली.
संचालन प्राध्या. महेंद्र बुर्लावार, नमुदेव कापगते, यांनी तर आभार प्रदर्शन- प्राध्या. संजय भुरभुरे यांनी केले.
याप्रसंगी प्राध्यापक शिक्षक- शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व्रुंद, पालक, स्काऊट- गाईड, हरित सेना, राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे विदयार्थी व पथक प्रमुख, विदयार्थी उपस्थित होते.