वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार.!

अरुण बारसागडे नागभीड तालुका प्रतिनिधी /-
ब्रम्हपुरी तालुक्यातील दुधवाही येथील शेतशिवरात वाघाने हल्ला करून एका शेतकऱ्याला ठार केल्याची घटना आज सकाळी ११: ०० वाजताच्या सुमारास घडली आहे.
मुखरू राऊत वय वर्षे (६२) असे असून दुधवाही गावातील रहिवाशी असे वाघाच्या हल्लात ठार झालेल्या शेतकऱ्याचे माहिती आहे.
धानपिकाची लागवड शेतकरी मुखरू च्या शेतावर केली असून नियमित आपल्या शेतावर धानपिकाची देखभाल करण्यासाठी शेतावर गेला असता बांधा आड दबा धरून बसलेल्या वाघाने मुखरु वर हल्ला चढवून ठार केलें.
वाघाचे संभाव्य धोके लक्षात घेता संबधित वनविभाग नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीक करीत आहेत.