चामोर्शी – भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७५ वर्ष पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर आजादी का अमृत महोत्सव अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत नगरपंचायत चामोर्शी प्रशासनातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते .
या स्पर्धांमध्ये प्राविण्यासह प्रथम , द्वितीय , तृतीय येणाऱ्या स्पर्धकांना आज दिनांक १७ ऑगस्ट रोजी सांस्कृतिक भवन बाजार चौक येथे बक्षीस वितरण सोहळा व समारोपीय कार्यक्रमात पार पडले .
दिनांक ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट पर्यंत – प्रास्ताविका वाचन ,हुतात्मा स्मारक स्वच्छता , क्रांतिदिन ,बालगोपाल महोत्सव ,महिला मेळावा , तिरंगा रॅली , बेस्ट फार वेस्ट (राखी) , निबंध स्पर्धा , चित्रकला स्पर्धा , स्वच्छता रॅली , पंतप्रधान आवास योजना मार्गदर्शन मेळावा , सेल्फी विथ तिरंगा , वीर पुरुषांची माहिती , माझी वसुंधरा शपथ , व्यसनमुक्ती शपथ , वृक्षारोपण , पर्यावरण संवर्धन शपथ अशा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्या स्पर्धकांना रोख रक्कम , प्रमाणपत्र ,पुष्पगुच्छ ,सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले
बक्षीस वितरण सोहळ्याच्या उद्घाटन नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष लोमेश बुरांडे केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष जयश्री वायलालवार हे होते प्रमुख अतिथी म्हणून नगरपंचायत चे सभापती सुमित तुरे , प्रेमा आईचवार ,नगरसेवक निशांत नैताम , नगरसेविका गीता सोरते ,वर्षा भिवापुरे , स्नेहा सातपुते, काजल नैताम, वंदना गेडाम , अधिक्षक मोरेश्वर पेंदाम , कर निरीक्षक भारत वासेकर आदी मान्यवर उपस्थित होते .
नगरपंचायत प्रशासनामध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या कर्मचारी लेखापाल जगदीश नक्षीने , अभियंता निखिल कारेकर स्वच्छता निरीक्षक अब्दुल हफीज सय्यद, श्रीकृष्ण भशांशंकर यांना प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले
चित्रकला स्पर्धेत कोयल मंडल ,सनहिता कंदीकुरवार ,प्रज्वल बोलीवार ,आचल येबडवार ,निबंध स्पर्धेत कपिल कुनघाडकर ,आर्यन भांडेकर, यज्ञा कुनघाडकर ‘ आचल सातपुते, रोशन पालथीया , बेस्ट फार वेस्ट ( राखी ) स्पर्धेत जान्हवी भिमनवार , टीना कुमरे ,गौरी भिरकुंडवार ,सेल्फी विथ तिरंगा स्पर्धेत कविता दिलीप बंडावार ,अक्षय शातलवार ,प्रेम वासेकर या स्पर्धकांना प्रत्येकी रोख रक्कम , प्रशस्तीपत्र ,सन्मानचिन्ह , पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे संचालन प्रा .शितल बुर्लावार प्रास्ताविक लेखापाल जगदीश नक्षीने तर आभार विजय पेद्दीवार यांनी मानले कार्यक्रमाला सर्व नगरपंचायतीचे अधिकारी , कर्मचारी , मुख्याध्यापक, शिक्षक ,विद्यार्थी व गावातील नागरिक , कृषक हायस्कूलचे स्काऊट गाईड पथक बहुसंख्येने उपस्थित होते .