स्वातंत्र्य सेनानी व सैनिकांनी दिलेल्या बलिदानामुळे आज अमृत महोत्सवाचा सूर्य पाहायला मिळाला:-का.उदघाटक आमदार कृष्णाजी गजबे
पोलीस स्टेशन आरमोरीतर्फे सन्मान सोहळा संपन्न
आरमोरी:-
गडचिरोली पोलीस दल व पोलीस स्टेशन आरमोरी यांच्या वतीने स्वातंत्र्य सैनिक,माजी सैनिक तसेच पोलीस परिवार यांचा आझादी का अमृत महोत्सव 2022 या निमित्ताने सन्मान सोहळा दि.21/08/2022 ला महात्मा गांधी महाविद्यालय आरमोरी येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमाला उदघाटक आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री कृष्णाजी गजबे यांनी स्वातंत्र्यासाठी प्राणपणाला लावणाऱ्या हुतात्मे,स्वातंत्र्य सेनानी व सैनिकांनी दिलेल्या बलिदानामुळे आज अमृत महोत्सवाचा सूर्य पाहायला मिळाला असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आरमोरी तहसिलचे तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांनी भूषविले,कार्यक्रमात पोलीस उपविभागीय अधिकारी प्रणित गिल्डा, वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम,मा.आ.रामकृष्ण मडावी,मा.आ.आनंदराव गेडाम,मा.आ.हरिराम वरखडे, आरमोरी नगर परिषदचे नगराध्यक्ष पवन नारनवरे,सरपंच संघटनेचे अध्यक्ष संदीप ठाकूर व इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना पोलीस स्टेशन आरमोरीचे पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांनी म्हटले की कुणी लहानशी मदत केली तरी त्यांचे आपण आभार मानतो त्यासाठी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सीमेवर परकीय शत्रूंना मात देणारे सैनिक व अंतर्गत सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलातील शहीदांचे बलिदानाची आठवण व त्यांचे आभार म्हणून सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे असे सांगितले.
या कार्यक्रमात स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना,माजी सैनिकांना,विरपत्नी यांना आमंत्रित करून शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला,यात देशभक्तीपर गाणांवर विविध शाळांनी नृत्य करून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक कांचन उईके तसेच आभार पोलीस उपनिरीक्षक संभाजी झिंगुर्डे यांनी केले.