अमृत महोत्सव वकृत्व स्पर्धेत कार्मेलची “समृध्दी ” व , “हेमांशी “ची बाजी

चामोर्शी – भारतीय स्वातंत्र्य दिनाचां आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमा अंतर्गत येथील तहसील कार्यालय व पंचायत समिती प्रशासनातर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत
कार्मेल अकाडमीची मिडस्कुलगटात समृध्दी बोनगिरवार तर हायस्कूल गटातून “हेमांशी माळवे” प्रथम क्रमांक पटकावला आहे
आझादिका अमृत महोत्सव कार्यक्रम साजरा करण्यासाठी
तहसील कार्यालय व पंचायत समितीच्या वतीने शहरातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यासाठी निबंध,न्यूत्य , सांस्कृतिक, चित्रकला,आदि स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्या विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरणकार्यक्रम आयोजीत करण्यात आला त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम, उद्घाटक तहीलदारा संजय नागटिळक, प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी सागर पाटील, सहा, गटविकास अधिकारी वणखंडे, नायब तहसीलदार नरोटे, राजू वैद्य, कावळे, गटशिक्षणाधिकारी नरेंद्र मस्के,, शिक्षण विस्तार अधिकारी अलोने, केन्द्र प्रमुख हिंमतराव आभारे आदी उपस्थित होते. अमृत महोत्सव स्पर्धेतील वकृत्व स्पर्धेत. कार्मेल अकाडमी इयत्ता ३ ते ५ गटात जलज मंडल , इयत्ता ६ ते ८ मध्ये समृध्दी बोनगिरवार,तेजस वंजारी, इयत्ता ९ ते १० मध्ये हेमांशी मांडवे, चित्रकला स्पर्धेत कोमल मंडल, रिया तडफदार, प्रतिफा बिस्वास, निबंध स्पर्धेत जलज मंडल, प्रिना वडेट्टीवार, , सजुक्ता अलुरवार, सांस्कृतिक कार्यक्रमात ऋषी कुंनघाडकर, आदी विजेत्या स्पर्धकांना, प्रशस्तीपत्र ,सन्मानचिन्ह , पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे हस्ते गौरविण्यात आले संचालन मानंपल्लीवार,प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी अलोने, तर आभार नरेंद्र मस्के यांनी मानले असून कार्मेल अकाडमीचेमुख्याध्यापक रेवं फादर आगस्टीन अलेंचारी यांनी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले आहे