गडचिरोली जिल्हा वर्धापन दिनाचे औचित्य साधून चर्चासत्राचे आयोजन

प्रतिनिधी न्युज  जागर गडचिरोली 

जिल्हा विकास संशोधन व समन्वय संस्था व जन आंदोलन विकास मंच गडचिरोली यांचा संयुक्त उपक्रम

स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव आणि गडचिरोली जिल्हा निर्मितीला 40 वर्ष पूर्ण होत आहे यानिमित्त जिल्हा वर्धापन दिनाचे औचित्य साधून दिनांक 26/8/2022 ला दु.2 वाजता. श्री निंबोरकर सर यांचे घरी, आरमोरी रोड,गडचिरोली येथे गडचिरोली जिल्हा आज व उद्या या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जेष्ठ समाज सेवक डॉ. शिवनाथ कुंभारे, जेष्ठ पत्रकार द हितवाद चे जिल्हा प्रतिनिधी मा रोहिदास राऊत सर, मा प्रकाशभाऊ ताकसांडे माजी उपाध्यक्ष नगरपरिषद गडचिरोली, मनोहर हेपटसर, प्रकाश अर्जुनवार साहेब, आदिवासी सेवक व कवियत्री कुसूम अलाम, मा. गुलाबराव मडावी नगरसेवक गड, मुकूंदाजी मेश्राम सर, प्रदीप कुलसंगे आदि प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ समाज सेवक डॉ. शिवनाथ कुंभारे हे होते. यावेळ कुंभारे सरांनी जिल्हा निर्मिती चे अनुभव सांगितले कि, कशा प्रकारे बाबुरावजी मडावी साहेब यांच्या अथक परिश्रमाने गडचिरोली जिल्ह्याचे स्वप्न हे साध्य होऊ शकले हे लक्षात आणुन दिले. याप्रसंगी उपस्थित सहभागी मान्यवरांनी जिल्हा विकासाचे दृष्टीने आपले विचार, सूचना, जिल्हा विकासाचे प्रश्न मुद्देसूद व त्यावर उपाययोजना सुद्धा मोजक्या शब्दात श्रोत्यांन समोर मांडले.

1.जिल्ह्यातील एखाद विधानसभा क्षेत्र  हे अनारक्षित ठेवावं.
2.लोकप्रतिनिधी हे पक्षाचे गुलाम असतात त्यांच्या कडून फार अपेक्षा बाळगू नये.
3.सुर्जागड खानिसंदर्भात कोंनसरीचा प्रकल्प म्हणजे गाजराची पुंगी.
4.गडचिरोली नगरपालिका अंतर्गत झालेला ड्रेनेज प्रकल्प म्हणजे जनतेची लूट.
5.राजकीय प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी जनतेची लूट करीत आहे त्यांचेवर कोणाचाही वचक राहिलेला नाही.
6.महिलांचे व लहान मुलींचे शोषण हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
7.प्राथमिक शिक्षण चा बट्ट्याबोळ झालेला आहे.त्यामुळे शासनाकडून विकास कुणाचा होत आहे हाच मुळात गंभीर प्रश्न आहे असे मत अनेकजणांनी आजच्या चर्चा सत्रात खंत व्यक्त केली आहे.

जिल्ह्यात विमानतळ व्हावे,नैसर्गिक साधन संपतीत सर्वसामन्यां वाटा मिळावा, हिस्त्र पशू कडून होणारे मांनसावरील हल्ले थांबावे,रेल्वे च काय झालं कुठे बेपत्ता झाली याच खासदारांनी जनतेला सांगावं, दुग्ध व पशू पालणाकडे भर द्यावा,आदिवासी विकास करीता विशेष निधी प्राप्त करावा,राज्य मार्ग तत्काळ दुरुस्त करावे,धान सडतात त्यासाठी गोडाऊन व्यवस्था करावी धान्य सडते त्यास जिल्हाधिकारी यांना जबाबदार धरावे,रेती जनतेला योग्य माफक दरात मिळावी, नॅक्सलवाद हा आदिवासी विकासातील अडथळा असून पर्यटन विकास त्याला पर्याय होऊ शकतो.