प्रेसनोट
नुकतेच राज्य सरकारने राज्यातील सर्व शाळांनमध्ये वर्गात शिक्षकांचा फोटो लावण्याचा आदेश सर्व शिक्षणाधिकारी व शिक्षण निरीक्षक यांना दिले होते.
29 आँगस्टला शिक्षकांनी काळ्या फिती लावून केले काम
मंत्रिमंडळात झालेल्या चर्चेनुसार शिक्षण आयुक्त पुणे यांनी 24 ऑगस्ट 2022 रोजी राज्यातील शिक्षणाधिकारी व शिक्षण निरीक्षक यांना विसीद्वारे ए फॉर साईज पेपरवर शिक्षकांचे वर्गात फोटो लावण्याचे आदेश दिलेले आहेत. तसेच पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांबद्दल अपमानजनक वक्तव्य केले आहे. या दोन्ही घटना समाज व्यवस्थेतील शिक्षकांच्या सन्मानाला धक्का देणाऱ्या आहेत. शासन पातळीवर जाणीवपूर्वक शिक्षकांना बदनाम करून अनुदानित शिक्षण व्यवस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.
राज्यभरातील शिक्षक समन्वय समितीच्या माध्यमातून आम्हाला शिकवू द्या अभियान चालवून शिक्षकांना वर्गात शिकवू देण्याची मागणी करत आहेत. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी आणि शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्राला पुन्हा नंबर एक वर आणण्यासाठी ठोस कृती कार्यक्रम देण्याची गरज असताना शिक्षण विभाग शिक्षकांचे मानसिक खच्चीकरण करत आहे. विविध शैक्षणिक कामांचे ओझे शिक्षकांवर लादून शिक्षकाचा वेळ वर्गात शिकवण्यापेक्षा इतर कामांमध्ये कसा जाईल, त्याचा परिणाम म्हणून शैक्षणिक दर्जा राखण्यात शिक्षकांना अपयशी कसे ठरवले जाईल आणि अखेर त्याचे खापर शिक्षकांच्या माथ्यावर फोडून अनुदानित शिक्षण व्यवस्था बंद करण्याचा घाट शासनाने सुरू केला आहे. शिक्षक भारतीने याचा तीव्र निषेध केला व आज काळ्या फिती लावून या मोहिमेचा विरोध केला आहे. यावेळेस गडचिरोली येथे शिक्षक भारतीचे राज्य उपाध्यक्ष मा. राजेंद्र झाडे सर यांच्या नेतृत्वात प्रा. संजय खेडिकर सर राज्य संयुक्त कार्यवाहक, भाऊराव पत्रे सर विभागीय अध्यक्ष नागपूर, राजेश कात्रटवार जिल्हाध्यक्ष शिक्षक भारती गडचिरोली, अरूण मुनघाटे, जिल्हाध्यक्ष माध्यमिक, विष्णू दुनेदार सचिव, अमरदिप बुर्ले सर, आदि उपस्थित होते. चंद्रपूर येथे शिक्षक माहिती शिक्षक भारती विभागीय सचिव सुरेश डांगे यांच्या नेतृत्वात श्री भास्कर बावनकर जिल्हाध्यक्ष चंद्रपूर चंद्रपूर, अनिल वासेकर जिल्हाध्यक्ष मु . संघ , मा. किशोर दरेकर चंद्रपूर अध्यक्ष , गगाधर खिरटकर सहकार्यवाह बिपिन करमरकर, विजय दुर्गे गोंडपिपरी तालुका, सुरेश शंभरकर शहरमहा सचिव अध्यक्ष, रामदाजी कामडी विशेष शाळा अध्यक्ष प्रदिप जेणेकर शहर संघटक, जवादे सर शहर सचिव, खी ये साबरे शहर उपाध्यक्ष, विलास खडसे शहर उपाध्य, गुरुपुडे शहर सचिव यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन पाठवण्यात आले.