श्री अरुण बारसागडे नागभीड तालुका प्रतिनिधी , न्यूज जागर
तळोधी बाळापुर पोलीस स्टेशन मध्ये विविध गुन्ह्यात जप्ती व जमा असलेल्या दुचाकी वाहनांचा लिलाव होणार आहे. हा लिलाव कोर्टाच्या आदेशानुसार व या विविध गुन्ह्यातील १० दुचाकी वाहनांवर कोणीही आपला अधिकार न दाखविल्यामुळे या गाड्यांचा लिलाव होणार असल्याची माहिती तळोधी बाळापुर पोलीस स्टेशनचे निरीक्षक डि.आर. शेंडे यांनी दिली.
हा लिलाव येत्या ३१ ऑगस्टला होनार असुन लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पोलिस स्टेशन तळोधी (बा.) सोबत संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले.