शेतकऱ्यांच्या हक्कासाठी राजकीय पक्ष व संघटनेच्यावतीने आरमोरी तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन

 

अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांची मोठी नुकसान झाली.कर्ज, उधारी करून शेतकऱ्याने आपली शेती पेरली.पण अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्याचे पीक उध्वस्त झाले त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.शेतकऱ्याला या परिस्थितीतुन बाहेर काढण्यासाठी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 पन्नास हजार रुपये मदत देण्यात यावी या व इतर मागण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,शेतकरी कामगार पक्ष, प्रहार जणशक्ती पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना,युवारंग सामाजिक संस्था,रयत शेतकरी संघटना ,आम आदमी पार्टी, किसान सभा व शेतमजूर युनियन च्या वतीने आरमोरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले.

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 पन्नास हजार रुपये देण्यात यावे ,वाघाच्या भीतीमुळे ज्या शेतकऱ्यांनी शेती पेरली नाही किंवा ज्या शेतकऱ्यांना वाघाचा धोका निर्माण झालेला आहे त्यांना सुद्धा हेक्टरी 50,000 पन्नास हजार रुपये देण्यात यावे ,श्रावण बाळ निराधार योजना व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना 5000 पाच हजार रुपये प्रति माहा पेन्शन देण्यात यावी,साठ वर्ष्यावरील सर्व शेतकरी ,शेतमजूर ,कामगार,यांच्या करिता 5,000 पाच हजार रुपये पेन्शन देण्यात यावी. आरमोरी नागरपरिषद क्षेत्रात रोजगार हमी सुरू करण्यात यावी.सण 2021 हंगामातील शेतकऱ्यांना 1,000 हजार रुपये बोनस देण्यात यावे. पावसामुळे ज्यांची घरे पडली त्यांना घर बांधकामासाठी दोन लाख रुपये देण्यात यावे. इत्यादी मागण्याचे निवेदन तहसीलदार मार्फत प्रधानमंत्री व मुख्यमंत्री, वनमंत्री याना देण्यात आले.
या आंदोलनात कॉ. अमोल मारकवार ,निखिल धार्मिक, राजेन्द्र भाऊ साळवे, रंजित भाऊ बनकर, दिलीप घोडाम,महादेव कोपूलवार,मंजुषा बेदरे,राहुल जुवारे,प्रफुल खापरे,विभा बोबाटे,शुभांगी गराडे, राजू समृतवर,देवाशीष सरदार ,विठ्ठल प्रधान ,रिंकू झरकर,हरिभाऊ वलोदे,स्वप्निल वाढई, किशोर जोउनजलकर, नेपचंद्र पेलणे,हरिदास मोंगरकर,राजू सातपुते,इश्वर खोब्रागडे, जयराम जागळे, छाया मानकर,रवींद्र दुमाणे,व शेतकरी ,शेतमजूर सहभागी झाले होते.