छात्रभारती विद्यार्थी संघटनेची राज्य कार्यकारिणी गठीत अध्यक्षपदी रोहीत ढाले

न्यूज जागर प्रतिनिधी

विज्ञान युगातील विद्यार्थ्यांची समतावादी संघटना हि ब्रिदवाक्य घेऊन चालणारी छात्रभारती या विद्यार्थी संघटनेची राज्य सभा नुकतीच पार पडली यावेळी संघटनेच्या राज्य अध्यक्ष पदी मुंबईचे रोहीत ढाले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर नाशिकचे समाधान बागुल यांची राज्य कार्याध्यक्ष तथा अहमदनगरचे अनिकेत घुले यांची राज्य कार्यवाह म्हणून निवड करण्यात आली. त्याच्या नियुक्ती बद्दल छाया काविरे पुणे जिल्हाध्यक्ष, धुळे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटिल, संघटक मनीष पाटिल, अहमदनगर जिल्हाध्यक्ष राहुल जऱ्हाड, तालुकाध्यक्ष तृप्ती जोर्वेकर, सचिन बनसोडे, सागर भालेराव आदिनी शुभेच्छा दिल्या.