शिवाजी विद्यालयात स्वयंशाशन(विद्यार्थी शिक्षक दिन) उत्साहात साजरा 

चामोर्शी तालुका प्रतिनिधी, न्यूज जागर 

चामोर्शी स्थानिक शिवाजी विद्यालयात शिक्षक दिन अर्थातच विद्यार्थी स्वयंशाशन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस संपूर्ण देशात शिक्षक दिन म्हणून साजरा करतात त्याचप्रमाणें विद्यालयात सुद्धा स्वयंशाशन दिन साजरा करण्यांत आलं. याप्रसंगी विद्यालयातील काही विद्यार्थ्यानी शालेय कार्यालयातील विविध भूमिका साकारत भविष्यातील शिक्षक कसे बनू याविषयी अनुभव घेतले. कार्यक्रमाकरिता प्राचार्य रा ना ताजने, उपप्राचार्य आर एस ताराम पर्यवेक्षिका श्रीमती सेलूकर उपस्तीत होते. स्वयंशाशन कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता शिक्षक शिक्षिका यांचे मोलाचे मार्गदर्शन भविष्यातील शिक्षकांना लाभले.

कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थिनी धनश्री कुनघाडकर, साक्षी चीचघरे, तर आभार उराडे, मनस्वी खंडारे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली