गडचिरोली प्रतिनिधी, न्यूज जागर
धरणे आंदोलनामध्ये विविध संघटनांचा सहभाग
झारखंड राज्यातील राची येथे भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारणी सदस्या सिमा पात्रा यांनी एका आदिवासी महिलेला जिभेने फरशी, लघवी चाटायला लावली, आदिवासी महिलेचा आठ वर्ष डांबून छळ केला! त्याच्या ह्या अमानुष कृत्याबद्दल योग्य शिक्षा झाली पाहिजे याकरिता गडचिरोली जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटनांनी आज दि. 7/09/2022 ला स्थानिक इंदिरा गांधी चौकात एकदिवसीय धरणे आंदोलन कार्यक्रम घेण्यात आला.
भाजपच्या महिला नेत्याचे अमानवीय कृत्य!!
झारखंड मधील रांची येथील भाजपच्या महिला नेत्या सीमा पात्रा या महिलेने आदिवासी समाजाच्या 29 वर्षीय सुनीता खाखा नामक महिलेला रांची मधील आपल्या राहत्या घरात 8 वर्ष डांबून ठेवले होते. हि घटना उघडीस आल्यावर देशभरातील आदिवासी संघटना व अन्य सामाजिक संघटनांनी या घटनेच्या विरोधात भाजपा नेत्या सिमा पात्रा यांच्या विरोधात तीव्र जनाक्रोष निर्माण झाला. आदिवासी महिलेचा हा छळ मानवतेला काळीमा फासणारा आहे.
आदिवासी खाखा नामक महिलेला स्वतच्या घरात डांबून ठेवून तिला जिभेने फारसी साफ करायला लावली, लघवी विष्ठा चाटायला लावली. रॉडने दात तोडणे, गरम तव्याने चेहरा भाजणे असे अमानवी अत्याचार त्यांच्यावर केलेत. सीमा पात्रा भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची सदस्य होती घटनेनंतर भाजपने तिला निलंबित केले आहे. या घटनेचा निषेध म्हणून गडचिरोलीतील सर्व आदिवासी संघटनांनी यावेळेस केंद्र सरकार कडून आदिवासी समूहाला समूळ नष्ट करण्याचा हा अजेंडा आहे. देशभर आदिवासी दलितांच्या महिला मुली घरकामाच्या नावाखाली गुलाम केल्या जात आहेत. त्यांचे आयुष्य उध्वस्त केले जात आहे. त्यांचं शारीरिक शोषण सुद्धा या माध्यमांतून होत आहे. केंद्र सरकारने अशा महिला मुलीचा शोध घेतला पाहिजे. गरीब दलित आदिवासी महिला गायब आहेत, त्यांचा तपास लागला पाहिजे.
भाजप एकीकडे आदिवासी राष्ट्रपती केल्याचं ढोंग करते तर दुसरीकडे आदिवासी महिलेला लघवी चाटायला लावते. एवढ्या मोठ्या पदावरील जबाबदार महिला नेत्या असं कशा वागू शकतात. मानवी हककांची ही हत्या आहे, महिला आयोग उद्धवस्त झाल्याचे संकेत आहेत. आदिवासी महीलाची ही अवस्था विषमतेतून झालेली आहे. सीमा पात्रा ला अटक का झालेली नाही? असे एक ना अनेक प्रश्न यावेळी विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारने पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नये. नुपूर शर्माला पाठीशी घातले तसे या सीमा ला पाठीशी घालू नये.
या घटनेचे देशभर पडसाद उमटत आहेत. या सरकारकडे आदिवासी, दलितांचे संरक्षण करण्याची कसलीच योजना नाही धोरण नाही. अमृत महोत्सव सुरू आहे सगळे पेढे वाटले गेले, आदिवासी महिलेला विष्ठा चाटायला दिली. अशावेळी स्वतंत्रता प्रश्नचिन्ह कायम आहे. भारतीय समाज व्यवस्था आदिवासी दलितांना मुख्य प्रवाहात येऊच देत नाही त्यांना गुलाम ठेवणे हाच त्यांचा अजेंडा असतो. यावेळी धरणे आंदोलनकर्त्यान कडून जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे मार्फत मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
या धरणे आंदोलनात गुलाबराव मडावी, रोहिदास राऊत, वसंतराव कुलसंगे, अमोल कुळमेथे, कुणाल कोवे, भरत येरमे, अमरसिंह गेडाम, साईनाथ पुंगाटी, मुकुंदा मेश्राम, मधुकर मेश्राम प्रदिप कुलसंगे, सुधीर मसराम, पंकज कोडापे, संजय मसराम, माणिक गेडाम, अमीत गेडाम, आकाश कोडापे, प्रशांत मडावी, मंगेश नैताम, सौ. विना उईके, सौ. हेमाताई कुलसंगे, सौ. विद्या दुगा, अन्नपूर्णा मेश्राम, सौ.भारती मडावी, सौ.मालता पूडो, सौ. जयश्री येरमे, कु. मनिषा मडावी, बबीता उसेंडी , बादल मडावी, मनिषा मडावी, बबीता उसेंडी, गणेश कुमरे, ललीत गेडाम, सुरज मडावी आदि आदिवासी समाज बांधवांन सहित, अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, गडचिरोली, ऑल इंडिया आदिवासी एमप्लाॅइज फेडरेशन, गडचिरोली, कै. बाबुराव मडावी स्मारक समिती, गडचिरोली, आदिवासी गोंडवाना गोटुल समीती, मुरखळा/नवेगाव, आदिवासी युवा जंगोम सेना, मुरखळा/नवेगाव, आदिवासी एकता युवा मंच, गडचिरोली, आदिवासी नारी शक्ती संघटना, गडचिरोली, गोंडवाना एस.टी कामगार संघटना, गडचिरोली, राष्ट्रीय शहीद विर बाबुराव आदिवासी विकास प्रबोधन समीती, गडचिरोलीचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.