शेगांव तालुक्यातील राशन कार्ड धारकांना तात्काळ राशन सुरु करा -आदर्श मिडीया चे युवराज गजभीये यांची मागणी

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर 

शेगांव, दि. १५/१२/२०२२

आदर्श मिडीया एसोसिएशन महाराष्ट्र सचिव युवराज गजभीये यांनी शेगांव तालुक्यातील निष्क्रीय पुरवठा अधिकारी भगत व गोदाम व्यवस्थापक बोरोडे यांची जिल्हाधिकारी बुलढाणा व अपर सचिवांकडे तक्रार

माटरगावं येथील हातमजुरांकडे राशन कार्ड असुन सुद्धा मागील चार पाच वर्षापासुन त्यांना धान्यापासुन वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे माटरगावं चे पिडीतांनी आदर्श मिडीया एसोसिएशन च्या महाराष्ट्र प्रदेश सचिव युवराज गजभीये यांचे कडे विनंती अर्ज दिले. गोदाम निरीक्षक बोरोडे व तालुका पुरवठा अधिकारी विशाल भगत यांना भेटून विचारना केली असता विशाल भगत यांच्या चुका दिसुन आल्या, मागील दोन वर्षापासुन शेगांव येथे प्रभारी पुरवठा अधिकारी म्हणुन नियुक्त असुन सुद्धा भगत यांचे गोरगरिबांच्या अर्जाकडे दुर्लक्ष असल्याचे दिसुन आले त्यामुळे दिनांक ९ डिसेंबर २०२२ ला अपर सचिव पुरवठा विभाग मंत्रालय मुंबई, जिल्हाधिकारी बुलढाणा, जिल्हा पुरवठा अधिकारी बुलढाणा तसेच तहसीलदार शेगांव यांचे कडे तालुका पुरवठा अधिकारी विशाल भगत, गोदाम निरीक्षक बोरोडे, कार्ड लिपिक पांडे यांची तक्रार करण्यात आली.

 

आदर्श मिडीया एसोसिएशन चे महाराष्ट्र प्रदेश सचिव गजभीये यांनी तक्रार करुन आठ दिवस निघुन गेले परंतु वरिष्ठांनी निष्क्रीय पुरवठा अधिकारी विशाल भगत व अद्याप कोणतीही कारवाई केल्याचे दिसुन येत नाही आणी अद्याप राशन कार्ड धारकांना धान्य मिळाले नाही. गजभीये हे १६ लोकांना घेऊन अपर सचिव अन्न पुरवठा विभाग मंत्रालय यांचेकडे तक्रार घेऊन जाणार आणी मागील पाच वर्षापासुन ज्यांना धान्यापासुन वंचित राहावे लागत आहे त्यांना लवकरच न्याय मिळवुन देणार असल्याची माहिती मिळाली आहे.