आदिवासींच्या न्याय हक्कासाठी 21 डिसेंबरला नागपूर येथे मोर्चा

न्यूज जागर गडचिरोली 

जिल्ह्यातील हजारो आदिवासी बांधव राहणार उपस्थित
प्रत्येक जिल्हा, तालुक्यात मोर्चा संदर्भात बैठका
मोर्च्यामध्ये लाखाच्या संख्येत आदिवासी समाज राहणार उपस्थित

गडचिरोली,दि.१५/१२/२०२२

राज्य सरकारद्वारे न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करून बोगस आदिवासींना अधिसंख्य पदावर नियुक्तीचे आदेश देऊन खऱ्या आदिवासींचे हक्कावर गदा आणणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकार विरोधात दि. 21 डिसेंबर 2022 ला आदिवासी जमाती मधिल 45 जमातीच्या संपूर्ण संघटनानी उलगुलान पुकारला असून त्या संदर्भात दि. 4/12/2022 ला चंद्रपूर येथे शिक्षक मेळाव्याला आलेले शिक्षक आमदार मा. कपिल पाटिल यांना संघटनेच्या वतीने निवेदन देऊन या संदर्भात विधिमंडळात सरकार जाब विचारावे अशी विनंती करण्यात आली. त्याच अनुषंगाने दि.13/12/2022 ला आदिवासी एकता युवा समितीच्या वतीने नवेगाव येथे समाज बांधवांची बैठक घेऊन आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी 21 डिसेंबर रोजी नागपूर विधानभवनावर काढण्यात येणाऱ्या भव्य मोर्चामध्ये जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घेण्यासंबंधी नियोजन सभा घेण्यात आली त्यात प्रत्येक गावात सभा घेऊन त्या गावातील नागरिकांना सहभागी करून घेण्या संबंधी नियोजन करण्यात आले. त्यानुसार गाव भेटीचे व भेटीत सहभागी होणाऱ्या कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांचे संयुक्तपणे नियोजन तयार करण्यात आले. आपल्या घटनात्मक न्याय अधिकारांसाठी आरपारची लढाई असल्याने यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी आदिवासी एकता युवा समितीचे सचिव प्रदिप कुलसंगे, कार्याध्यक्ष संजय मसराम, कोषाध्यक्ष मंगेश नैताम, सल्लागार/सदस्य मुकुंदाजी मेश्राम, वासुदेव कोडापे, उमेशभाऊ ऊईके, गिरिष ऊईके, प्रफुल्ल कोडापे, आकाश कोडापे, प्रशांत मडावी आदि पदाधिकाऱ्यांन सह नवेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तुकाराम मडावी, दिनेश मडावी, बाबुरावजी आलाम , राजु मडावी, विश्वनाथ मेश्राम, पवन आत्राम, अरविंद मडावी, तसेच गावकरी उपस्थित होते.