मंत्राने भाजला पापड मोडून दाखवा. – हरिभाऊ पाथोडे

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी , न्यूज जागर

जीवनापूर येथे अंधश्रद्धा निर्मूलन पर मार्गदर्शन कार्यक्रम, पावसातही केला कार्यक्रम.

नागभिड तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले गाव जीवनापूर येथे आदर्श शारदा मंडळ च्या वतीने काल रात्र गावामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळेस मुख्य मार्गदर्शक म्हणून अ.भा.अनिस चे महाराष्ट्र राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे यांनी मंत्राने भाजला पापड मोडून दाखविण्याचे आवाहन केले.या जगात मंत्राचा कोणताही परिणाम होत नाही.जादुटोण्याचे अस्तित्व नाही हे ठासून सांगितले. अ.भा.अनिस चे चंद्रपूर जिल्हा सहसचिव अनिल लोणबले, अ.भा.अनिस चे नागभीड तालुका संघटक यशवंत कायरकर, यांनीही मार्गदर्शन केले.
मुख्य मार्गदर्शक म्हणून हरिभाऊ पाथोडे यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करून , कशाप्रकारे बुवा बाबा समाजातील लोकांना फसवतात हे सांगत वेगवेगळे प्रयोग करून. त्या मागचे वैज्ञानिक कारण स्पष्ट केले. तथाकथित चमत्कारामागील हातचलाखी समजावून सांगताना म्हणाले जर कोणी आमचे पंचेविस लाखांचे आव्हान स्वीकारून हवेतून सोन्याची चैन वा मौल्यवान वस्तू काढण्याऐवजी तांदळाचा पोता किंवा गव्हाचा पोता काढून दाखवत असेल तर त्याला पंचेविस लाखांचे बक्षीस देऊ. मात्र असे कोणीही करत नाही. कारण ज्या वस्तू शरीरात लपवता येतात त्याच वस्तू काढल्या जातात . मात्र ज्या वस्तु लपवता येत नाही त्या काढता येत नाही असेही त्यांनी सांगितले.

यावेळी अनिल लोनबले यांनी बोलताना समितीची भूमिका समजावून सांगितली व “आमच्या समिती चा देवा धर्माला विरोध नाही मात्र देवा धर्माच्या नावाने समाजातील लोकांना फसवतात, लुबाडणूक करतात आमची समीती त्यांचे पासून समाजाला वाचविण्यासाठी प्रयत्न करीत असते.” असे त्यांनी सांगितले.
नागभीड तालुका संघटक यश कायरकर यांनी “जगाने भरारी घेत चंद्र – मंगळावर पाऊल ठेवली मात्र आपण अजूनही मंगळ अमंगळ यामध्ये गुरफटून कित्येक परिवार व समाज उध्वस्त झालेले असून. दैवी शक्ती अंगात आल्याचे भासवून बुवा बाबा हे त्यांच्याकडे जाणाऱ्या लोकांना एक दुसऱ्याचे नाव सांगून समाजात वाद निर्माण करतात. कित्येक घर परिवार उध्वस्त करतात त्यामुळे यांच्यापासून सावध राहणे गरजेचे आहे.” असे सांगितले.
विशेष म्हणजे हा प्रबोधन पर कार्यक्रम पाऊसातही सुरू होता,यावेळी पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते भारतभाऊ चुनारकर, यदुनाथ लेंझे, देवेंद्रजी ऊईके, सचिन रामटेके, रामदिन नान्हे उपस्थित होते. तर मोठ्या संख्येने जिवनापूरवासी महिला-पुरुष उपस्थित होते.
विशेष म्हणजे पाऊस कोसळत असताना सुद्धा सर्वांनी पावसांत या प्रबोधन कार्यक्रमाचा लाभ घेतला.